Raja Raghuvanshi Murder: सोनम रघुवंशी राज कुशवाहाच्या प्रेमात होती, आणि तेने कुटुंबाला जर जबरदस्ती राजा रघुवंशीसोबत लग्न लावलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिली होती अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. राजाचा मोठा भाऊ विपिनने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, सोनमने तिच्या आईला राजसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं होतं. परंतु तिच्या आईने या नात्याला विरोध केला.
"विपिन आणि सोनम यांनी आधीच त्यांच्या आईला राजसोबतच्या नात्याची माहिती दिली होती. मला राजासोबत लग्न करायचं नाही असं तिचं म्हणणं होतं. पण तिच्या आईने राजसोबतच्या नात्याला विरोध केला आणि आपल्याच समाजात लग्न करण्याचा निर्णय घेतला," अशी सूत्रांची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, "विपीनने दावा केला आहे की, सोनमने तडजोड करत लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. तसंच याचे परिणाम भोगण्यास तयार राहा असा इशारा दिला होता. कोणीही ती राजाची हत्या करेल असा विचार केला नव्हता".
दरम्यान सोनम आपला पती राजा रघुवंशीच्या हत्येसाठी इतकी घाईत होती की तिने आपला प्रियकर राज कुशावाहला जर हल्लेखोर त्याला ठार करण्यात अपयशी ठरले तर मी त्याला डोंगराच्या कडेवरुन ढकलून देईन असं सांगितलं होतं. "जर विशाल, आनंद आणि आकाश राजाची हत्या करु शकले नाही, तर मी फोटो घेताना त्याला डोंगरावरुन खाली ढकलून देईन," असं सोनमने तिच्या प्रियकराला सांगितलं होतं अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सोनम लग्नानंतर चार दिवसांनी 15 म् रोजी इंदूर येथील माहेरी परतली होती. यानंतर लगेचच तिने पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिथून तिने गुवाहाटीची तिकिटं बुक केली आणि फोन कॉलत्या माध्यमातून राजसोबत कट रचला. दरम्यान राजाशी शारीरिक संबंध ठेऊ नयेत आणि वेळ मिळावा यासाठी सोनमने मेघालयला जाण्यापूर्वी कामाख्या मंदिरात जाण्यास त्याला तयार केलं होतं.
23 मे रोजी राजा आणि सोनम मेघालयातील नोंगरियाट गावात एका होमस्टेमधून बाहेर पडले. दहा दिवसांनंतर, राजाचा मृतदेह सुमारे 20 किमी अंतरावर एका खोल दरीत आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजाची हत्या तीन जणांनी केली होती. विशाल सिंग चौहान (22), आकाश राजपूत (19) आणि आनंद कुर्मीला सोनमने हत्येसाठी सुपारी दिली होती. हे सर्वजण राजचे मित्र होते.
राज कुशवाह आणि इतर तीन आरोपी सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत. राजा रघुवंशीच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्यावर धारदार वस्तूने दोनदा वार करण्यात आल्याचं उघड झालं होतं. "शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्यावर दोन धारदार जखमा असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये एक मागून आणि एक समोरून आहे, " पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम म्हणाले