Marathi News> भारत
Advertisement

एएन-32 विमान अपघात : भारतीय वायुसेनेची उद्या सकाळी शोध मोहीम

 भारतीय वायुसेना उद्या सकाळी हेलीकॉप्टरने इथे रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे.

एएन-32 विमान अपघात : भारतीय वायुसेनेची उद्या सकाळी शोध मोहीम

प्रणव प्रियदर्शी, झी मीडिया, नवी दिल्ली : भारतीय सेनेचे विशेष दल अरुणाचल प्रदेशच्या लिपो येथे 12 हजार फूट उंच आणि डोंगरांनी घेरलेल्या अत्यंत दुर्गम ठिकाणी गेले आहे. याच दुर्गम ठिकाणी मंगळवारी 9 दिवसांनंतर भारतीय वायुसेनेचे एएन-32 एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झाले. भारतीय वायुसेनेच्या एमआय 17 हेलीकॉप्टरने शोधण्यात यश आले आहे. 3 जूनला आसामच्या जोरहाट येथून भारतीय वायुसेनेच्या एएन-32 विमानाने अरुणाचलच्या मेन्चुकासाठी उड्डाण घेतले. त्यानंतर विमान संपर्कातून तुटले आणि विमानाचे अवशेष आढळले. भारतीय वायुसेना उद्या सकाळी हेलीकॉप्टरने इथे रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे.

हे क्षेत्र अरुणाचल प्रदेशच्या शियोमी आणि सियांग जिल्ह्यामध्ये येते. भारतीय वायुसेनेचे बेपत्ता झालेल्या विमानाची माहीती देणाऱ्यास पाच लाखाच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती. भारतीय वायुसेनेच्या विशेष पॅरा ट्रॅपर्स पथकास इथे चाचपणी करण्यास पाठवण्यात आले. एन-32 एअरक्राफ्टमध्ये असलेल्या पायलटसह भारतीय वायुसेनेच्या 13 जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. 

शोध मोहिमेत असलेल्या एमआय 17 हॅलीकॉप्टरने आज (मंगळवारी) टाटोच्या उत्तरपूर्व आणि लिपोच्या उत्तरेत 16 किलोमीटर अंतर आणि 12 हजार फूट उंचीवर विमानाचे अवशेष शोधण्यात आले. विमानात असलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती वायुसेनेतर्फे देण्यात आली. शोधमोहीम जशी पुढे जाईल तशी पुढची माहिती देण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे. 

Read More