Marathi News> भारत
Advertisement

क्षणात मायेचा हात निसटला... मुलासोबत जाणाऱ्या आईला भरधाव गाडीने उडवलं; CCTV मध्ये जीवघेणा अपघात कैद

एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन रस्त्याकडेने जात होती. तेव्हा एका भरधाव कारने आईला उडवलं आहे. हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

क्षणात मायेचा हात निसटला... मुलासोबत जाणाऱ्या आईला भरधाव गाडीने उडवलं; CCTV मध्ये जीवघेणा अपघात कैद

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टक्कलमधून एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या या व्हिडीओमध्ये एक भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलेला धडक देऊन उडवलं आहे. 33 वर्षीय बदरिया स्वागतमदु गावात राहणारी महिला आपल्या मुलासोबत रस्त्याच्या कडेने जात आहे. तेव्हा अचानक एक पांढऱ्या रंगाची कार लेनमधून डाव्या बाजूला सरकली आणि त्या महिलेला जोरदार टक्कर मारली. 

भरधाव वेगाने येणाऱ्या या कारने महिलेला इतकी जोरात धडक दिली की ती काही फूट उडाली. त्या महिलेसोबत चालत असलेला महिला अगदी पुण्यवान ठरला आणि तो या अपघातात वाचला गेला. या व्हिडीओत मुलगा अगदी लगेच बेशुद्ध झालेल्या आईकडे धावला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. हे दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. एक निरागस मुलगा आपल्या बेशुद्ध झालेल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.  

या सगळ्या प्रकरणानंतर रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना कोट्टक्कलच्या खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. त्या महिलेवर उपचार सुरु आहे. 

Read More