Marathi News> भारत
Advertisement

'माझ्यासोबत एक रात्र घालव, 40000 मिळतील...', सासऱ्याने दिली ऑफर; सुनेनं नवऱ्याला सांगितल्यावर त्याने...

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या मंडळीने सुनेचा पहिले छळ केला. त्यानंतर सासऱ्यांनी तर हद्दच पार केली. माझ्यासोबत एक रात्र घालवली तर तुला 40000 रुपये देईल अशी ऑफर दिली. त्यानंतर तिने नवऱ्याला तक्रार केल्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली.     

'माझ्यासोबत एक रात्र घालव, 40000 मिळतील...', सासऱ्याने दिली ऑफर; सुनेनं नवऱ्याला सांगितल्यावर त्याने...

उत्तर प्रदेशातील आग्रामधून एक भयानक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून सुनेचे छळ होत होते. एवढंच नाही तर सासऱ्याने त्यांच्यासोबत सुनेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैशांची ऑफर दिली. हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिने नवऱ्याला तक्रार केली. तर त्यानेही पत्नीला मारहाण केली. याबद्दल महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली असता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

हे प्रकरण कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील असून येथे राहणाऱ्या एका तरुणीचे 2019 मध्ये शमशाबाद रोडवरील नेहरू एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लग्न झालं. लग्नानंतर सासऱ्याचे सुनेवर वाईट नजर होती. अनेक वेळा तिच्याशी अश्लील शब्दात ते बोलत होते. महिलेने याबद्दल तिच्या पतीला सगळं सांगितलं. पण पतीने पत्नीची बाजू घेण्याऐवजी पतीनेही वडिलांना पाठिंबा देत म्हटलं की, ते सांगतात तसे कर. जेव्हा महिलेने पतीचे ऐकले नाही तेव्हा पतीने तिला मारहाण करण्यात आली अशी तक्रार तिने पोलिसांना केली. (Spend a night with me you will get 40000 father in law offered physical relation daughter in law told her husband viral news)

प्रकरण इथेच संपले नाही. सासरच्यांच्या कृत्यांना कंटाळून, महिलेने पुन्हा तिच्या पतीकडे तक्रार केली तेव्हा पती म्हणाला, मलाही तू माझ्या वडिलांचे ऐकावे असे वाटते. हे ऐकून ती महिला रागावली आणि तिच्या माहेरी गेली. तिच्या माहेरी गेल्यानंतर दोन दिवसांनी, सासरे त्याच्या सुनेकडे पोहोचले आणि तिला एकटी पाहून त्याने तिच्या शरीराला स्पर्श केला आणि शारीरिक संबंधांची मागणी केली. त्या बदल्यात 40 हजार रुपये देऊ असं सांगितलं. यादरम्यान, महिलेने तिच्या सासरच्या कृत्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याच वेळी, महिलेने पैसे देऊन शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल व्हॉट्सअॅप चॅट देखील केलाचा पुरावा ठेवला होता. ज्यामध्ये सासरच्यांनी आपली चूक मान्य केली आहे.

अश्लील व्हिडीओ आणि गप्पा

एवढंच नाही तर महिलेने तिच्या सासऱ्यांवर गैरवर्तन आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. तिने तिच्या सासऱ्यांचा अश्लील कृत्यांचा व्हिडीओ आणि चॅटही पोलिसांना दाखवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कारवाई करत आहेत. तपासाच्या आधारे कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

Read More