Marathi News> भारत
Advertisement

काय म्हणता? रंग बदलतं 'या' तलावाचं पाणी; भारतातील हे ठिकाण कुठे आहे माहितीये?

पाहा तुमच्यापासून किती दूर आहे हे ठिकाण   

काय म्हणता? रंग बदलतं 'या' तलावाचं पाणी; भारतातील हे ठिकाण कुठे आहे माहितीये?

लाहौल : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे, असं म्हणतात. तुम्हाला जर या देशात फिरण्याची संधी मिळाली असेल तर ही बाब लगेचच लक्षात येईल. देशाची भौगोलिक रचना आणि हवामान पाहता प्रत्येक ठिकाण हे एकमेकांहून तितकंच वेगळं आणि सुंदर आहे. 

भारतात पर्यटनस्थळं काही कमी नाहीत. काही पर्यटनस्थळं तर आपल्या विचारांच्या पलीकडे सुंदर आहेत. अशा या ठिकाणांपैकीच एक ठिकाण असं आहे, जे पर्यटकांना वेड लावतं, खिळवून ठेवतं आणि आपल्या सौंदर्यानं हैराण करतं. 

हिमाचलमधील लाहौल स्पिीतीमध्ये असणारं हे ठिकाणं चहूबाजूंनी मोठाल्या डोंगररांगांनी वेढलेलं आहे. इतं मधोमध अतिशय स्वच्छ, नितळ पाण्याचा तलाव आहे. या ठिकाणाचं नाव आहे, चंद्रताल (Chandrataal Lake).  

The Moon Lake ही या तलावाची आणखी एक ओळख. समुद्रसपाटीपासून या तलावाची उंची साधारण 4300 मीटर इतकी आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या परिसरात जोरदार बर्फवृष्टी होते. परिणामी हा परिसर पर्यटकांसाठी वर्षातील तीन ते चार महिने बंद असतो. (Spiti valley chandratal lake Moon Lake himachal pradesh)

हा तलाव लाहौल स्पितीमधील स्थानिकांसाठी धार्मिकदृष्टाही तितकाच महत्त्वाचा आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून तीन वेळा या तलावातील पाण्याचा रंग बदलतो. वर्षातून हजारो पर्यटक या तलावाला भेट देतात. 

fallbacks

स्पिती आणि कुल्लूच्या खोऱ्यापासून काही अंतरावर असणाऱ्या या तलावाचा आकार चंद्राप्रमाणे असल्यामुळंच त्याला चंद्रताल असंही म्हटलं जातं. इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला जो प्रवास करावा लागतो तो आयुष्यभर लक्षात राहील असाच असतो. 

fallbacks

fallbacks

कसं पोहोचाल?

इथं येण्यासाठीचे दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता मनालीच्या बाजूनं आणि दुसरा रस्ता किन्नौरच्या बाजुनं येतो. रस्ते मार्गानं कुंजूमवाटे इथं ट्रेक करतही पोहोचता येतं. कधी एकेकाळी हे ठिकाण स्पिती आणि कुल्लू येथे येणाऱ्या जाणाऱ्या लडाखी व्यापाऱ्यांठी त्यांच्या व्यवसायाचं मुख्य केंद्र होतं. 

Read More