Marathi News> भारत
Advertisement

भय्यू महाराजांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडली आहे.

भय्यू महाराजांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडली आहे. सुरूवातील भय्यू महाराज यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत होतं, पण त्यानंतर त्यांचं निधन झाल्याची बातमी आली आहे. ही इंदूरमधील घटना असल्याचं सांगण्यात आलं आहे, भय्यू महाराज यांनी गोळी मारल्याची बातमी एएनआयने दिली आहे. इंदूरमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं, राहत्या घरी त्यांनी स्वत:ला गोळी मारल्याचं सांगण्यात येत आहे. भय्यू महाराज यांनी गोळी का झाडून घेतली, याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. भय्यू महाराज यांनी काही दिवसांपूर्वीच दुसरा विवाह देखील केला होता. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर भय्यू महाराज यांनी दुसरा विवाह केला होता. भय्यू महाराज यांची ही आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत आहे.

भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येवर पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

भय्यू महाराज यांनी गोळी झाडल्याची बातमी आली तो पहिला व्हिडिओ

Read More