नेपाळचे लोकप्रिय कपल सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय होते. बिबेक पंगेनी जवळपास दीड वर्ष बिछान्यावर रुग्णावस्थेत होते. या दरम्यान पत्नी सुबेदीने नवऱ्याची खूप सेवा केली. सोशल मीडियावर याचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वी बिबेकचं निधन झालं. यानंतर आता पहिल्यांदा सृजना सुबेदीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पतीच्या निधनानंतर सृजना पूर्णपणे कोलमडून गेली आहे. युझर्स हे फोटो बघून सुबेदीला 'कलयुगातील सीता' असा उल्लेख केला आहे.
भगवान सबको ऐसी ही सजनी दे साथ निभाने वाली
— Ajay Tiwari Rojwari (@AjayTiwariBassi) January 5, 2025
और फिर कलयुग की सीता, संन्यासी बन गई
इस लालच से भरी दुनियां में कुछ #SrijanaSubedi सी लड़कियां भी है। जो निस्वार्थ प्रेम को परिभाषित कर गयी#srijanavivek pic.twitter.com/tvW1fZYD4O
बिबेकच्या निधनानंतर सृजना सुबेदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीत बिबेकच्या फोटोला माळ घातली असून सृजना पूजा करताना दिसत आहे. यासोबत आणखी एक महिला दिसत आहे. सृजना सुबेदी शुन्यात नजर रोखून दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक लोक कमेंट करत असून परमेश्वर तिला हिंमत द्यावी अशी प्रार्थना करत आहेत.
सृजना आणि बिबेक यांची लव्हस्टोरी शाळेतच सुरु झाली. 10 वर्षांपूर्वीच या दोघांची ओळक झाली. 6 वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. हे कपल अतिशय आनंदी आणि लोकप्रिय असं कपल होतं. पण बिबेकची अचानक तब्बेत बिघडू लागली आणि त्याचा करुण अंत झाला.