Marathi News> भारत
Advertisement

SBI ग्राहकांसाठी खुशखबर; आता कोणत्याही शुल्काशिवाय करता येणार व्यवहार!

SBI : एबीआय ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधांच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात. 

SBI ग्राहकांसाठी खुशखबर; आता कोणत्याही शुल्काशिवाय करता येणार व्यवहार!

SBI : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. तुम्हाला बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामासाठी बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही.   आता मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना एसएमएस (sms) शुल्क भरावे लागणार नाही.

बँकेने जाहीर केले की, मोबाईल फंड ट्रान्सफरवरील (mobile fund transfer) एसएमएस शुल्क माफ करण्यात आले आहे. म्हणजेच एबीआय ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधांच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात.

ट्विटरवर ही माहिती शेअर करताना एसबीआयने म्हटले आहे की, "मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एसएमएस शुल्क आता माफ झाले! ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतात." याचबरोबर, पुढे म्हटले आहे की ग्राहक पैसे पाठवणे, पैशांची विनंती करणे, अकाउंट बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट पाहणे आणि UPI पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सेवांचा लाभ घेऊ शकतात. 

काय आहे USSD?

यूएसएसडी किंवा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा सामान्यतः टॉक टाइम बॅलन्स किंवा अकाउंटची माहिती तपासण्यासाठी आणि मोबाइल बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जातो. ही सेवा फीचर फोनवर काम करते आणि कोणताही एसबीआय ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतो. फीचर फोन वापरणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Read More