Marathi News> भारत
Advertisement

Stock Market Crash : शेअर मार्केटमध्ये मोठा धमाका! 7466476262 एवढ्या पैशांचा चुराडा

शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली आहे.  सेन्सेक्स आणि निफ्टीचे निर्देशांक कोसळले आहेत. यामुळे काही तासात  7466476262 कोटींचा चुराडा झाला आहे. 

Stock Market Crash : शेअर मार्केटमध्ये मोठा धमाका! 7466476262 एवढ्या पैशांचा चुराडा

Stock Market Crash:  फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash) मोठा धमाका पहायला मिळाला.  सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी पडझड झाली. याचा थेट फटका गुंकवणुकदारांना बसला. अवघ्या काही तासात  7466476262 कोटींचा चुराडा झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर शुल्क लादण्याची घोषणा केली. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला. जागतिक बाजारातही मोठी घसरण झाली आहे.  

सेन्सेक्स 940 अंकांनी घसरून 73670 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 270 अंकांनी घसरून 22774 वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेचा निर्देशांक 48250 वर पोहचला. रिलायन्स आणि एचडीएफसी बँक वगळता, बीएसईच्या सर्व टॉप 30 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. इंडसइंड बँकेत सर्वात मोठी घसरण झाली.  इंडसइंड बँकेचे शेअर्स 4.50 टक्क्यांनी कोसळले.  बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे बाजारावर दबाव आला.  परिणामी स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सच्या किमती सर्वाधिक घसरण पहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा टेक महिंद्रा, एचसीएल टेकसह अनेक कंपन्यांचे शेअर्सही घसरले. एफआयआयच्या विक्रीमुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 900 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याने  गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीएसई मार्केट कॅपमध्ये 6.72 लाख कोटी रुपयांची घट होऊन ते 386.38  लाख कोटी रुपयांवर आले, जे काल बाजार बंद होता तेव्हा हाच निर्देशांक 393.10 लाख कोटी रुपये होते. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा शेअर बाजाराला फटका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 मार्चपासून मेक्सिको आणि कॅनडावर कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यासह चीनवरील शुल्क आणखी वाढवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्याचा परिणाम आज आशियाई बाजारपेठेवर दिसून आला आणि आता भारतीय बाजारपेठेतही मोठी पडझड झाली आहे. 
टॅरिफ मुद्द्यावर ट्रम्प यांची अस्पष्ट भूमिका, आयटी क्षेत्रातील शेअर्सवरील दबाव, डॉलरची वाढ आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकीतील (एफआयआय)सतत विक्री या सर्वचा परिणाम शेअर बाजारावर पहायला मिळाला आहे. 

Read More