Marathi News> भारत
Advertisement

Multibagger Stock | या बँकेच्या शेअरने 1 वर्षात दुप्पट केला पैसा; राकेश झुनझुनवालांनीही केली गुंतवणूक

शेअर बाजारात तेजीत असलेल्या बँकिंग सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे.

Multibagger Stock | या बँकेच्या शेअरने 1 वर्षात दुप्पट केला पैसा; राकेश झुनझुनवालांनीही केली गुंतवणूक

मुंबई : शेअर बाजारात तेजीत असलेल्या बँकिंग सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे. बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना वर्षभरात मोठा फायदा झाला आहे. कॅनरा बँकेच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षाही चांगले राहिले आहेत. बँकेचा जुलै - सप्टेंबर 2021 तिमाहीममध्ये नेट प्रॉफिट साधारण तिप्पट वाढून 1333 कोटी रुपये झाला आहे. 
मागील वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीमध्ये बँकेने 444 कोटी रुपये नफा नोंदवला आहे. कॅनरा बँकेत बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्येही सामिल आहे. 

Canara Bank : एका वर्षात दुप्पट कमाई
कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मागील एक वर्षात बंपर कमाई केली आहे. मागील एका वर्षात कॅनरा बँकेने 128 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये शेअरचा भाव 85 रुपये होता. तर
 27 ऑक्टोबर 2021 ला शेअरचा भाव 201 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. चांगल्या तिमाही निकालांमुळे बुधवारी बँकेच्या शेअरने सकाळच्या सत्रात 4 टक्क्यांची तेजी नोंदवली होती. 

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक
मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेत प्रथमच होल्डिंग घेतली आहे. 27 ऑक्टोबर 2021 मध्ये त्याची वॅल्यू 581 कोटी रुपये आहे.

मागील वर्षी एखाद्या गुंतवणूकदाराने कॅनरा बँकेचे 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते, तर आज त्याची वॅल्यू आज 2 लाख 35 हजार इतकी झाली असती.

 

 

 

 

Read More