मुंबई : Stock to Buy : जर तुम्हाला पैशातून पैसे कमवायचे असतील तर शेअर बाजारात गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. शेअर बाजारात खरेदीसाठी बाजारातील तज्ज्ञ संदीप जैन यांनी मजबूत स्टॉकवर सट्टा लावण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला बंपर कमवायचे असेल आणि अल्पावधीत नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही संदीप जैनच्या बेस्ट पिकवर खरेदी करू शकता. संदीप जैन यांनी नाहर पॉलीवर (Nahar Poly) आज म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला जाणून घेऊया कंपनीची मूलभूत तत्त्वे कशी आहेत आणि या शेअरमध्ये खरेदी का करावी.
Nahar Poly वर एक्सपर्टचा सल्ला
संदीप जैन म्हणाले की, या कंपनीने सप्टेंबर तिमाहीत उत्कृष्ट निकाल सादर केले आहेत. त्यामुळेच या शेअरवर खरेदीचा सल्ला दिला जात आहे. ही कंपनी ओडब्ल्यूएम ग्रुप या नावाने अधिक ओळखली जाते.
CMP - 261.55
Target - 290/320
बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांच्या मते कंपनीचे मूलभूत तत्त्वे भक्कम आहेत. ही कंपनी अत्यंत स्वस्त मुल्यांकनात व्यापार करत आहे. एवढेच नाही तर ही कंपनी 8 च्या PE मल्टिपलवर काम करते. CAGR म्हणजेच गेल्या 3 वर्षातील नफ्याचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 76 टक्के आहे.
जैन सा'ब के GEMS...
— Zee Business (@ZeeBusiness) November 11, 2021
आज Nahar Poly को क्यों चुना संदीप जैन ने ?
संदीप जैन से जानिए कंपनी के फंडामेंटल्स, तेजी के ट्रिगर्स और टार्गेट..@SandeepKrJainTS | @AnilSinghvi_ #StockMarket | #StockToWatch | #NaharPoly | #StockToBuy pic.twitter.com/v0GyYSqBZQ
कंपनीने या वर्षी सप्टेंबर तिमाहीत उत्कृष्ट निकाल सादर केले. या वर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 23 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 16 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याशिवाय कंपनीमध्ये प्रवर्तकांची 70 टक्के हिस्सेदारी आहे.