Marathi News> भारत
Advertisement

सूटकेसमधून गर्लफ्रेंडला बॉइज हॉस्टेलमध्ये आणलं; रंगेहाथ पकडला गेला अन्..; पाहा Video

Student Girlfriend In Suitcase Watch Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर उमटताना दिसत आहेत.

सूटकेसमधून गर्लफ्रेंडला बॉइज हॉस्टेलमध्ये आणलं; रंगेहाथ पकडला गेला अन्..; पाहा Video

Student Girlfriend In Suitcase Watch Video: 'प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं' असं म्हटलं जातं. खरं तर आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रेमात पडलेली माणसं काहीही करु शकतात असंही म्हणतात. कोणी चंद्र-तारे तोडून आणण्याचा शब्द देतो तर कोणी तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला जपेल असं सांगतो. मात्र सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये प्रेयसीच्या अखंड प्रेमात पडलेल्या एका तरुणीने आपल्या प्रेयसीलाच बॅगमध्ये कोंबल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सारा प्रकार हरियाणामधील सोनीपतमध्ये समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असून, असा दावा केला जात आहे की, सदरचा व्हिडीओ सोनीपतमधील ओपी जिंदल युनिव्हर्सिटीतल्या कॉलेजच्या हॉस्टेलमधला आहे.

रंगेहाथ पकडलं

मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलींना आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुलांना प्रवेश नसतो. मात्र हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसीबरोबर काही खासगी क्षण घालवता यावेत या उद्देशाने तिला चक्क एका सूटकेसमध्ये कोंबून मुलांच्या हॉस्टेलमध्ये आणलं. मात्र हा मुलगा पकडला गेला. त्याला सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

सुरक्षारक्षकांना का आली शंका?

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून मुलांच्या हॉस्टेलमध्ये आणत होता त्यावेळी अचानक बॅगेतून मुलगी किंचाळल्याचा आवाज आला. आधी या तरुणीचं दुर्देव असं की बॅगेत बसलेली त्याची प्रेयसी किंकाळली तेव्हाच समोर सुरक्षारक्षक होते. त्यानंतर महिला सुरक्षारक्षकाला बोलावून बॅग उघडून तपासण्यात आली असता तरुणाचा भांडाफोड झाला. या बॅगमध्ये हात-पाय दुमडून चक्क एक मुलगी बसल्याचं बॅगेची चैन उघडताच स्पष्ट झालं. 

पाहा Video: मेट्रो स्टेशनवर अश्लील चाळे! त्याने गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्..; Video मुळे संतापाची लाट

महिला सुरक्षारक्षक बॅगेत डोकावतात अन्...

बॅगेत तरुणी असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीने या मुलीला बॅगेतून बाहेर काढलं. व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला सुरक्षारक्षक बॅगेची चैन उघडत असल्याचं दिसत आहे. बॅगेची चैन उघडल्यानंतर काहीजणी बॅगेत काय आहे पाहायला डोकावतात तेव्हा बॅगेतून एका तरुणीचं डोकं बाहेर येतं. ही मुलगी त्याचा कॉलेजची आहे की बाहेरची हे स्पष्ट झालेलं नाही. दोघांची नावंही समोर आलेली नाही. मात्र ज्या लॉबीमध्ये या दोघांची चोरी पकडली गेली तिथेच मोबाईल कॅमेरात कैद केलेला व्हिडीओ व्हायरल झालाय हे मात्र नक्की. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

अनेकांनी केली टीका

अनेकांनी हा बावळटपणा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या तरुणाला आणि तरुणीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला या व्हिडीओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करुन नक्की कळवा.

Read More