Marathi News> भारत
Advertisement

'पुढची सुट्टी कश्मीरमध्येच...'; पहलगाममध्ये दहशतवादी हल्लानंतर सुनील शेट्टीचं अनोखं आवाहन

Sunil Shetty Pahalgam Terror Attack : सुनील शेट्टीनं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देत भारतीयांना दिलं आगळं वेगळं आवाहन

'पुढची सुट्टी कश्मीरमध्येच...'; पहलगाममध्ये दहशतवादी हल्लानंतर सुनील शेट्टीचं अनोखं आवाहन

Sunil Shetty Pahalgam Terror Attack : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानं सगळ्यांना हादरुन सोडलं. या हल्ल्यात 26 भारतीयांनी त्यांचा जीव गमावला आहे. तर अनेक लोकं हे जखमी आहेत. या घटनेनंतर देशात सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्यात अनेक लोकांना काश्मीरला जाणं टाळलं आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं पुढच्या सुट्ट्या या कश्मीरमध्ये घालवा असं सांगितलं आहे. तर कश्मीर आपलं होतं आणि कायम आपलं राहिलं असं त्यानं म्हटलं आहे.

सुनील शेट्टीनं हे वक्तव्य लता दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड 2025 दरम्यान, मीडियाशी बोलताना केलं होतं. सुनील शेट्टीनं लोकांशी द्वेष आणि घाबरून त्यांच्या जाळ्यात अडकू नका असं म्हटलं आहे. त्यानं सांगितलं 'आपल्यासाठी मानवतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे. देव सगळं पाहतोय आणि योग्य न्याय तोच करेल. पण आता आपण भारतीय म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. भीती आणि द्वेष पसरवणाऱ्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही घाबरत नाही. आपण हे दाखवायचं आहे की कश्मीर आपलं होतं आणि आमचं आहे आणि कायम आपलं राहणार आहे. त्यामुळे सेना, राजकारणी आणि सगळे हाच प्रयत्न करत आहेत.'

सुनील शेट्टीनं पुढे सांगितलं की भारतीय नागरिक म्हणून आपण आपली पुढची सुट्टी ही कश्मीरमध्ये घालवण्यासाठी प्लॅन करायला हवे. 'आपण नागरिक म्हणून एक काम करायला हवं. आपली पुढची सुट्टी फक्त काश्मीरमध्येच असेल यासाठी आपण आतापासून सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आपल्याला त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की आपल्याला भीती नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कसली भीती नाहीच आहे.'

हेही वाचा : 'मला पाकिस्तानला जा म्हणतायत तर माझ्या बायकोला...', ट्रोलिंगवर अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

त्यानं पुढे सांगितलं की त्यानं अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली की त्याला कश्मीरमध्ये जाण्यास सांगितलं तर तो तयार आहे. मी स्वत: समोरून फोन करून सांगितलं की जर उद्या तुम्हाला वाटतं की आपण तिथे जायला हवं, पर्यटक किंवा कलाकार म्हणून जर तिथे शूटिंग करायची असेल किंवा फिरायचं आहे, आम्ही नक्कीच येऊ. जे काश्मीरी मुलं आहेत त्यांची यात काही चूक नाही. 

Read More