Marathi News> भारत
Advertisement

Sunny Leone Song | सनी लिओनीवर FIR दाखल होणार? 'त्या' गाण्यावर साधु-संतांचा तीव्र आक्षेप

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या 'मधुबन मे राधिका नाचे' या गाण्यावरून मध्य प्रदेशातही निदर्शने सुरू झाली आहेत.

Sunny Leone Song | सनी लिओनीवर FIR दाखल होणार? 'त्या' गाण्यावर साधु-संतांचा तीव्र आक्षेप

भोपाळ : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या 'मधुबन मे राधिका नाचे' या गाण्यावरून मध्य प्रदेशातही निदर्शने सुरू झाली आहेत. याआधी उत्तर प्रदेशातील मथुरेत याला प्रचंड विरोध झाला होता. 22 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या सनी लिओनीच्या या व्हिडिओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी साधु संतांनी केली आहे. मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सनी लिओनला इशारा देत माफी मागण्यास सांगितले आहे. हिंदू देवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.

सनी लिओनीच्या नवीन गाण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्लाही घेत असून जर सनी लिओनीने 3 दिवसांत गाण्याबद्दल माफी मागितली नाही आणि गाणे यूट्यूबवरून हटवले नाही, तर मध्य प्रदेश सरकार एफआयआर दाखल करणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. 

22 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या सनी लिओनीच्या या व्हिडिओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी संतांनी केली आहे. या गाण्यावर कारवाई करण्याची मागणी वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने अभिनेत्रीवर कारवाई केली नाही आणि व्हिडिओवर बंदी घातली नाही, तर न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सनीने माफी मागितली नाही तर तिला देशात राहू दिले जाणार नाही. अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक म्हणाले की, सनी लिओनीने हे गाणे अपमानास्पद पद्धतीने सादर करून ब्रिजभूमीच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे.

Read More