Marathi News> भारत
Advertisement

पत्रकारांवर बदनामीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने दिल्ला सल्ला

मीडिया विरोधात बदनामीचा आरोप करत सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती. 

पत्रकारांवर बदनामीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने दिल्ला सल्ला

नवी दिल्ली : मीडिया विरोधात बदनामीचा आरोप करत सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती. 

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सांगितले की, पत्रकारांना बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे. काही चुकीच्या पत्रकारांमुळे संपूर्ण मीडियाला यासाठी आरोपी धरू शकत नाही. न्यायादीश दिपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाई चंद्रचूड या तीन सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. 

खंडपीठाने सांगितले की, लोकतंत्रात तुम्हाला सहनशीलता शिकता आली पाहिजे. रिपोर्टिंग करताना उत्साहात काही चुका होऊ शकते. परंतु आपल्याला पत्रकारांना पूर्णपणे बोलण्याची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले पाहिजे. 

घोटाळ्याच्या बाबतीत न्यायालयात असे सांगण्यात आले की, रिपोर्टिंग करताना एखादा आरोप केला तर तो बदनाम केल्याचा अपराध होऊ शकत नाही. एका महिला पत्रकाराने रिपोर्टिंग प्रसारित करताना बदनाम केलं. त्यामुळे एका दुसऱ्या महिलेने आरोप केला पण तो खरा ठरू शकत नाही. 

Read More