Marathi News> भारत
Advertisement

सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू

आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या मारल्या.

सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू

गांधीनगर :  सुरतमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये १५ लोकांचा दुर्देवाीरित्या मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी सदर घटनेची दखल घेतली आहे. आगीच्या घटनेचं सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. 

आगीतून लोकांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. 

 

 

 सदर घटनेवर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मी दुखी आहे, असे मोदी म्हणाले.

 

सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्स भागात ही आग लागली आहे. .या आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या देखील घेतल्या.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. या आगीत काही प्रमाणात लोकं अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.  तसेच मृत्यूची आकडेवारी वाढण्याची भिती आहे. 

या इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर कोचिंग इनस्टीट्यू होते. या इनस्टीट्यू मध्ये ४० विद्यार्थी उपस्थित होते. आग लागल्याचे समजल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी ४ थ्या मजल्यावरुन उड्या घेतल्या. 

दरम्यान आगीवर नियंत्रण आल्याचे समजत आहे. 

Read More