Marathi News> भारत
Advertisement

Period Leaves | महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ही कंपनी देणार 2 दिवसांची पिरिअड लिव

ऑनलाईन फूड डिलीवरी  कंपनी स्विगी (swiggy)ने आपल्या महिला फूड डिलीवरी कर्मचाऱ्यांना महिन्यात दोन दिवसांची मासिक पाळी(Period Leaves)देण्याचा निर्णय घेतला आहे.

Period Leaves | महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ही कंपनी देणार 2 दिवसांची पिरिअड लिव

मुंबई : ऑनलाईन फूड डिलीवरी  कंपनी स्विगी (swiggy)ने आपल्या महिला फूड डिलीवरी कर्मचाऱ्यांना महिन्यात दोन दिवसांची मासिक पाळी(Period Leaves)देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले की, त्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसाठी '' नो क्वेश्चन-आस्कड, टुडे मंथली पिरिअड टाइम ऑफ पॉलिसी''चा ऑप्शन दिला आहे. कंपनीने स्वतः ही माहिती दिली आहे. 

स्विगीची विशेष सुरूवात

स्विगी ऑपरेशन्सच्या वाइस प्रेसिडेंट मिहिर शाह यांनी नुकतेच एका पोस्टमध्ये म्हटले की, 'मासिक पाळी दरम्यान, रस्त्याने कोणाकडे डिलीवरी करण्यास जाणे त्रासदायक असते.' यामुळेच अनेक क्षेत्रातील महिला काम करण्यास पुढे धजावत नाही. महिलांना मासिक पाळीशी संबधित अडचणींना सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दिवसांमध्ये कोणत्याही प्रश्नाशिवाय महिला डिलीवरी सहकाऱ्यांना महिन्यात दोन सुट्या (Paid Leaves)देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.'

महिला डिलीवरी पार्टनर्ससाठी सेफ झोन

2016 मध्ये डिलिवरी एजंट म्हणून पहिली महिला कर्मचाऱ्याला जॉइन केले होते. कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी पिरिअड लिवसोबत आणखी आवश्यक पावले उचलली आहेत. 

Zomato ने केली होती घोषणा

मागील वर्षी ऑनलाईन फूड डिलीवरी कंपनी झोमॅटो(Zomato)ने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी पिरिअड दरम्यान, वर्षात 10 पेड लिव डे ची सुरूवात केली होती. 

Read More