Marathi News> भारत
Advertisement

भारतातील रहस्यमयी गुहेत लपलेत अनेक रहस्य, गुहेत शिरताच बेपत्ता होतात माणसं, ब्रिटिशांनी...

Talatal Ghar Secret Tunnel: भुलभुलैयासारख्या भूमिगत खोल्या आणि राजघराण्यासाठी बांधण्यात आलेल्या या बोगद्याचे रहस्य काय 

भारतातील रहस्यमयी गुहेत लपलेत अनेक रहस्य, गुहेत शिरताच बेपत्ता होतात माणसं, ब्रिटिशांनी...

Talatal Ghar Secrets: तलातल घर ही 1765 इसवी सनमध्ये आसामच्या शिवसागरमधील अहोम वंशाकडून बनवण्यात आलेली एक आश्चर्यकारक वास्तुशिल्प आहे. एका लोकप्रिय कथेनुसार तलातल घरात 4 भुयारी जिने आणि दोन गुप्त बोगदे आहेत. हे तळघर बनवण्याचे एकमेव उद्देश म्हणजे शत्रूने हल्ला केल्यानंतर अहोम राजघराण्याला लपता यावे यासाठी बनवण्यात आले होते. भुलभुलैया असलेला भुयारी खोल्यांमध्ये अनेक लोक कायमचे बेपत्ता झाल्याचे सांगितले जाते. याचाच परिणाम म्हणून ब्रिटिशांनी हे भूमिगत प्रवेशद्वार कायमचे बंद केले. तलातल घर हे सर्व अहोम स्मारकांच्या तुलनेत भव्य आहे. वास्तवात तलातल या शब्दाचा अर्थ बहुमजली असा होतो. 

तळमजल्यावर अर्धवर्तुळाकार कमानी असलेले खांब आहेत. ज्यामध्ये काही खोल्यादेखील आहेत. हा मजला तबेले आणि साठवणुकीच्या खोल्यांसाठी वापरला जात असे, असं म्हटलं जातं. वरच्या मजल्यावर बहुतांश जागा मोकळी आहे. काही ठिकाणी छताच्या मजल्यावर खोदलेल्या वर्तुळाकार छिद्रांना लाकडी खांबासाठी असलेले पोस्ट होल असल्याचा संदर्भ आढळतो. जे लाकडापासून बनवलेल्या वरच्या मजल्यांचे अस्तित्व दाखवते. काही वास्तू हा एकापेक्षा अनेक छतांच्या आहेत. ते दो-चाल किंवा कुटीर शैलीमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. स्थापत्य कलेचे एक उत्तम उदाहरण आहे. 

ही वास्तू बांधण्यासाठी बांधकाम साहित्य हे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साधनांचा समावेश होता. उदाहरणार्थ, बांधकामासाठी काळ्या उडीद (मातिमा), बदकाची अंडी, चिकट तांदूळ (बोरा सौल), झिलखा (स्थानिक फळ), राळ, गोगलगाय चुना इत्यादींपासून बनवलेले कराल किंवा करहल नावाचे एक विशेष सिमेंटिंग मटेरियल वापरले जात असे. या संरचनेच्या काही खांबांवर गोल सजावटीचे गोलाकार तळ आहेत ज्यावर कोनीय झिग-झॅग डिझाइन आहेत. या विटा विशेषतः कोनीय आकारात बनवल्या गेल्या होत्या, अशी एक मान्यता आहे. 

लोकांच्या म्हणण्यानुसार, या गुप्त सुरंगाचा वापर फक्त राजघराण्यातील लोक शत्रूंपासून वाचण्यासाठी करत असतं. मात्र 2015मध्ये आयआयटी कानपूरने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने केलेल्या ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) सर्वेक्षणात कोणत्याही गुप्त बोगद्याचे अस्तित्व नसल्याचे समोर आले . परंतु अभ्यासात स्मारकाच्या डाव्या कोपऱ्याता बागेपासून 1.9 ते 4 मीटर खाली संरचनांची शक्यता वर्तवली आहे. भूकंप प्रतिरोधक असण्याबरोबरच दुहेरी पायावर बांधले गेले होते. 

Read More