Marathi News> भारत
Advertisement

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. टूरिस्ट बस दरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

Tamil Nadu Nilgiris Coonoor Bus Accident : तामिळनाडूमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जाताना ही दुदैवी घटना घडली आहे. या अपघात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. कुन्नूरमधील मारापलमजवळ दरीत ही बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं आहे. या अपघातात मृत पावलेल्यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. 

दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं असून मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. तर जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असं X वर पोस्ट करण्यात आली आहे.

तर PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना  2 लाख रुपये आणि जखमींना 50  हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

Read More