Marathi News> भारत
Advertisement

Tariff म्हणजे काय? 50% टॅरिफ लावलं म्हणजे नेमकं काय झालं? समजून घ्या 10 मुद्द्यांमध्ये सोप्या शब्दांत

What Does Tariff Mean How Does It Work: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलं आहे. याचा अर्थ काय होतो? टॅरिफ का आणि कशासाठी लावलं जातं? हा सारा प्रकार कसं काम करतो? जाणून घेऊयात...

Tariff म्हणजे काय? 50% टॅरिफ लावलं म्हणजे नेमकं काय झालं? समजून घ्या 10 मुद्द्यांमध्ये सोप्या शब्दांत

What Does Tariff Mean How Does It Work: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारतामध्ये अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील एकूण टॅरिफ आता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगात केवळ ब्राझीलवर अमेरिकेने इतका कर लादलेला आहे. भारत रशियाकडून तेल विकत घेत असल्याचा ठपका ठेवत जोपर्यंत भारत हे बंद करणार नाही तोपर्यंत आपण टॅरिफ आकारत राहू असं म्हटलं आहे. मात्र ट्रम्प सत्तेत आल्यापासून चर्चेत असलेला हा टॅरिफ प्रकार आहे तरी का? एखादा देश दुसऱ्या देशावर टॅरिफ का लावतो? त्याचा काय परिणाम होतो? याबद्दल अनेकांना कल्पना नाही. त्यावरच आपण प्रकाश टाकूयात...

टॅरिफ म्हणजे काय?

1 > टॅरिफ हा आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर असतो असं सोप्या भाषेत सांगता येईल. थोडं उलगडून सांगायचं झाल्यास, एका देशातून दुसऱ्या देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांवर सरकारद्वारे लादलेला कर म्हणजे टॅरिफ!

2 > टॅरिफलाच आयात शुल्क किंवा सीमाशुल्क असंही म्हणतात. टॅरिफ हा एक प्रकारचा कर आहे जो आयात केलेल्या मालावर लावला जातो. 

टॅरिफ का आकारतात?

3 > टॅरिफकडे सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहिलं जातं. टॅरिफ सरकारसाठी सर्वात मोठ्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एक असतो. 

4 > देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठीही टॅरिफ आकारला जातो. टॅरिफ देशांतर्गत उद्योगांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी लावला जातो. टॅरिफ लावल्याने आयात केलेल्या वस्तू महाग होतात आणि लोक आपोआप देशात तयार झालेल्या तुलनेनं स्वस्त वस्तुंची खरेदी करतात.

5 > टॅरिफ व्यापार धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सरकार आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करण्यासाठी टॅरिफचा वापर केला जातो. 

6 > राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठीही टॅरिफचा वापर केला जातो. कधीकधी, टॅरिफचा उपयोग काही विशिष्ट देशांवर दबाव आणण्यासाठी केला जातो. 

7 > जर भारताने अमेरिकेतून आयात केलेल्या स्टीलवर टॅरिफ लावला, तर अमेरिकेतील स्टील भारतामध्ये आणताना अधिक महाग होईल. ज्यामुळे अशा टॅरिफचा भारतीय स्टील उत्पादकांना फायदा होईल. याच उद्देशाने आता ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावला आहे.

8 > आयातीवर निर्बंध घालण्यासाठी टॅरिफचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, दुसऱ्या देशातून आलेल्या वस्तू खरेदी केल्यास अधिक पैसे मोजावे लागतात. परदेशी सेवांच्या किमतीही वाढवतात. अधिक किंमत असल्याने देशांतर्गत ग्राहक या वस्तूंकडे पाठ फिरवून स्थानिक किंवा देशांतर्गत तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य देतात.

9 > अमेरिकेने आता भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा सोपा अर्थ असा की भारताने 100 रुपयांची गोष्ट अमेरिकेत पाठवली तर तेथील लोकांना ती 150 रुपयांना विकत मिळेल. सहाजिकच तेथील लोक भारतातील वस्तूंकडे पाठ फिरवतील आणि या वस्तूंची मागणी कमी होऊन टप्प्या टप्प्यात व्यापार बंद होईल.

टॅरिफ लावल्यानंतरही वस्तू घेतल्या तर?

10 > टॅरिफचा निर्यातदार देशावर परिणाम होतो कारण ज्या देशातील टॅरिफ लादला आहे तेथील ग्राहक किमती वाढल्यामुळे आयात केलेल्या वस्तूंपासून दूर राहू शकतात. मात्र ग्राहक टॅरिफ लावल्यानंतरही आयात केलेल्या वस्तू, उत्पादनं निवडत असेल तर टॅरिफमुळे ग्राहकांसाठी आयात केलेल्या उत्पादनाची अधिक किंमत मोजावी लागते.

Read More