Marathi News> भारत
Advertisement

'जर्मन कार, इटालियन सूट, अमेरिकी शूज वापरणारे मोदी स्वदेशी माल घ्यायला सांगतात', खासदाराचा टोला; 'भाजपा नेत्यांची मुलं...'

Foreign Brands PM Modi Use: मोदींनी टॅरिफ वादानंतर भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलं असून याच मुद्द्यावरुन आता मोदी कोणकोणते परदेशी ब्रॅण्ड वापरतात याची यादीच समोर आणण्यात आली आहे.

'जर्मन कार, इटालियन सूट, अमेरिकी शूज वापरणारे मोदी स्वदेशी माल घ्यायला सांगतात', खासदाराचा टोला; 'भाजपा नेत्यांची मुलं...'

Foreign Brands PM Modi Use: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टॅरिफ प्रकरणावर घेतलेल्या भूमिकेवरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी टॅरिफ प्रकरणानंतर थेट उल्लेख न करता भाष्य करताना भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान आपण होऊ देणार नाही. यासाठी मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल असं विधान केलं. तसेच मोदींनी टॅरिफ नाट्यानंतर बोलताना स्वदेशीचा पुरस्कार करत स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर द्या असं म्हटलं. याच मुद्द्यावरुन राऊतांनी मोदी स्वत: कोणकोणत्या परदेशी गोष्टी वापरतात याचा पाढाच वाचला आहे. तसेच भारत-पाकिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावरुनही राऊतांनी मोदींना सुनालवं आहे.

स्वतः मोदी स्वदेशीचे किती अनुकरण करतात?

"अमेरिकेचे अध्यक्ष प्रेसिडंट ट्रम्प यांनी आतापर्यंत 34 वेळा सांगितले की, भारत-पाक युद्ध आपण थांबवले. यावर आपले लाडके पंतप्रधान मोदी यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या मौनातच युद्धबंदीचे रहस्य दडले आहे. मोदी हे भाजपच्या खासदारांसमोर आक्रमकपणे बोलतात. विरोधकांना शहाणपण शिकवतात, पण प्रेसिडंट ट्रम्प यांच्या भारतविरोधी वक्तव्यांपुढे ते नांगी टाकतात. प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावले व दंडही आकारला. तरीही मोदी बोलायला तयार नाहीत. “भारतीय लोकांनी आता परदेशी माल वापरू नये. स्वदेशी वस्तू घ्याव्यात” हे त्यांचे ‘टॅरिफ’वरचे उत्तर, पण स्वतः मोदी स्वदेशीचे किती अनुकरण करतात?" असा सवाल राऊत यांनी 'सामना'मधील 'रोठठोक' सदरामधून उपस्थित केला आहे.

मोदी कोणत्या ब्रॅण्डच्या गोष्टी वापरतात? राऊतांनी यादीच काढली

"भाजप नेत्यांची मुले परदेशात शिकतात. पुन्हा या सगळ्यांचा काळा पैसा विदेशी बँकेत. स्वदेशीची बात करणारे मोदी स्वतः जर्मन बनावटीची बीएमडब्ल्यू कार वापरतात. इटालियन बनावटीचा Giorgio Armani सूट वापरतात. केनेथ कोल (Kenneth Cole) या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात. रॉजर डुबुआ (Roger Dubuis) या इटालियन कंपनीचे घड्याळ, cooper vision (America) चा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी ते अमेरिकेत जातात व जनतेला ट्रम्प यांना विरोध म्हणून स्वदेशी माल घ्यावा असे सांगतात, हा विनोद आहे," असं म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

FAQ

1. पंतप्रधान मोदी यांनी टॅरिफ प्रकरणावर काय विधान केलं आहे?

पंतप्रधान मोदी यांनी थेट उल्लेख टाळत भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, यासाठी वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल असं म्हटलं आहे. तसेच, त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर देण्याचा पुरस्कार केला आहे.

2. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनावर काय प्रश्न उपस्थित केला आहे?

राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरातून प्रश्न उपस्थित केला आहे की, स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः स्वदेशीचं किती अनुकरण करतात?

3. राऊत यांनी पंतप्रधान मोदी कोणत्या परदेशी ब्रँडच्या वस्तू वापरतात याबाबत काय म्हटलं आहे?

राऊत यांनी पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या परदेशी वस्तूंची यादी दिली आहे:

बीएमडब्ल्यू कार: जर्मन बनावटीची.

Giorgio Armani सूट: इटालियन बनावटीचा.

Kenneth Cole बूट: अमेरिकन कंपनीचे.

Roger Dubuis घड्याळ: इटालियन कंपनीचे.

Cooper Vision चष्मा: अमेरिकन बनावटीचा.

आयफोन: अमेरिकेचा.

 

 

Read More