Marathi News> भारत
Advertisement

TATA ग्रुपच्या 'या' दिग्गज कंपनीचा येतोय IPO, 230000000 नवीन शेअर्समध्ये गुंतवणूकीची संधी!

TATA Capital IPO:  टाटा टेक्नॉलॉजीजच्या लिस्टिंगनंतर 2 दशकांत टाटा ग्रुपचा हा दुसरा आयपीओ आहे. 

TATA ग्रुपच्या 'या' दिग्गज कंपनीचा येतोय IPO, 230000000 नवीन शेअर्समध्ये गुंतवणूकीची संधी!

TATA Capital IPO: शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून कमाई करण्याची इच्छा असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा ग्रुपच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये लवकरच येणार आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा कॅपिटल आपला आयपीओ घेऊन येत आहे. यासाठी कंपनीच्या बोर्डमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. हा आयपीओ फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेलचा भाग असेल. 

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स वधारले

टाटा कॅपिटल ही एक वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून कंपन्या आणि संस्थांना विविध उत्पादने आणि सेवा पुरवली जाते. यामध्ये वैयक्तिक कर्जे, मालमत्तेवरील कर्ज, क्रेडिट कार्ड, गुंतवणूक बँकिंग आणि जीवन विमा इत्यादींचा समावेश आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर टाटा कॅपिटल हा पैशाशी संबंधित प्रत्येक गरजेसाठी एक पर्याय आहे. या आयपीओमुळे टाटा कॅपिटलकडे अधिक भांडवल येणार आहे. आयपीओ मंजूर होताच टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या सत्रात तो 5450.10 रुपयांवर बंद झाला होता. आज सुरुवातीच्या व्यवहारात तो 6343.80 रुपयांवर गेला.

 2 दशकांत टाटा ग्रुपचा हा दुसरा आयपीओ 

टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सकडे टाटा कॅपिटलमध्ये 93% हिस्सा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या लिस्टिंगनंतर 2 दशकांत टाटा ग्रुपचा हा दुसरा आयपीओ आहे. सप्टेंबर 2022 मध्ये आरबीआयने टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसला एक महत्त्वाची एनबीएफसी म्हणून घोषित केले. यानंतर टाटा कॅपिटलला आणखी कडक नियमांचे पालन करावे लागेल. आगामी 3 वर्षांत शेअर बाजारात सूचीबद्ध व्हावे लागेल.

23 कोटी नवीन शेअर्स करणार जारी 

या आयपीओमध्ये कंपनी 23 कोटी नवीन इश्यू जारी करणार आहे. तर सध्याचे भागधारक ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे त्यांचे भागभांडवल विकतील.

टाटा टेक्नॉलॉजीनंतर टाटा ग्रुपचा पहिला शेअर

नोव्हेंबर 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजीनंतर शेअर बाजारात आयपीओ आणणारी टाटा कॅपिटल ही टाटा ग्रुपची पहिली कंपनी असेल. असे असले तरी टाटा कॅपिटलने आयपीओशी संबंधित जास्त माहिती जाहीर केली नाही.

टाटा कॅपिटल बद्दल

गृहनिर्माण ते वैयक्तिक कर्जापर्यंत विविध वित्त सेवा देण्याच्या उद्दीष्टाने 2007 मध्ये टाटा कॅपिटलची स्थापना झाली. मार्च 2024 पर्यंत 92.8 टक्के भागीदारीने टाटा सन्स हा त्यांचा सर्वात मोठा भागधारक आहे.  टाटा कॅपिटल ही टाटा कॅपिटल ग्रुपच्या टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स आणि टाटा क्लीनटेक कॅपिटल या तीन कर्ज देणाऱ्या कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. यासोबतच टाटा सिक्युरिटीज, टाटा कॅपिटल सिंगापूर आणि त्यांच्या खासगी इक्विटी विभाग या तीन गुंतवणूक आणि सल्लागार कंपन्यादेखील संभाळते. टाटा कॅपिटलद्वारे अनेक प्रकारची आर्थिक कामे केली जातात. टाटा कॅपिटल हे टाटा समूहासाठी खूप महत्वाचे आहे. टाटा कंपनीवर ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे टाटा कॅपिटलच्या आयपीओला ग्राहकांची किती पसंती मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More