Marathi News> भारत
Advertisement

Tata Steel चे गुंतवणूकदार मालामाल; एका शेअरच्या बदल्यात मिळाले 10 शेअर्स

Tata Steel Stock Split: स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर टाटा स्टीलच्या शेअर्सची फेस वॅल्यू 10 रुपयांवरून 1 रुपये झाली. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात 23 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Tata Steel चे गुंतवणूकदार मालामाल; एका शेअरच्या बदल्यात मिळाले 10 शेअर्स

Tata Steel Stock Split: टाटा समूहाची स्टील उत्पादन कंपनी टाटा स्टीलच्या स्टॉकने आज (शुक्रवार, 29 जुलै 2022) रोजी विक्रमी तेजी नोंदवली. स्टॉक स्पिट झाल्याने शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली. स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर, गुंतवणूकदारांना टाटा स्टीलच्या एका स्टॉकसाठी 10 स्टॉक मिळाले असून स्टॉक स्प्लिटनंतर टाटा स्टीलचा शेअर 9 टक्क्यांनी वाढला. या वर्षी मे महिन्यात स्टॉक स्प्लिटची घोषणा करण्यात आली होती आणि त्यासाठी 29 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

1 महिन्यात स्टॉक 23% पेक्षा जास्त वाढला

स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर टाटा स्टीलच्या स्टॉकची फेस वॅल्यू 10 रुपयांवरून 1 रुपये झाली. गेल्या एका महिन्यात टाटा स्टीलचा स्टॉक 23 टक्क्यांहून अधिक वाढला.

टाटा स्टीलच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. टाटा स्टीलचा स्टॉक शुक्रवारी 107 रुपयांवर बंद झाला. आज 7 टक्क्यांनी वधारला. यामुळे टाटा स्टीलचे मार्केट कॅप 1,33,474.48 कोटी रुपयांपर्यंत वाढले. स्टॉकच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना 10,929.52 कोटी रुपयांचा फायदा झाला.

मे मध्ये स्टॉक विभाजन मंजूर
टाटा स्टीलने मे महिन्यात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली. स्टॉकच्या विभाजनानंतर, ज्या गुंतवणूकदाराकडे टाटा स्टीलचा एक शेअर असेल त्याच्याकडे 10 शेअर्स असतील. 

स्टीलच्या बोर्डाने मे महिन्यात स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली होती. भांडवली बाजारातील तरलता वाढवण्यासाठी आणि छोट्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स सहज उपलब्ध व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे.

Read More