Bathing Mistake to Avoid: अंघोळ करणे हे आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग आहे. यामुळं शरीराची स्वच्छता तर राखली जाते पण अंघोळीचे अनेक फायदेदेखील आहेत. मात्र सकाळची हीच अंघोळ काही जणांसाठी जीवघेणीदेखील ठरू शकते. इंटरनेटवरील लोकप्रिय MBBS डॉक्टर ऋचा तिवारी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी अंघोळीसंदर्भात एक हैराण करणारा किस्सा शेअर केला आहे.
त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत त्या म्हणतात की, काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे एक 18 वर्षांच्या मुलीला दाखल करण्यात आले. ती मुलगी बेशुद्धावस्थेत होती. ति्च्या आईने सांगितले की, तरुणी बाथरुममध्ये अंघोळ करत होती. ती बराच काळ बाथरुममध्ये होती. रविवार असल्याने ती हेअरवॉश करत असेल असा अंदाज कुटुंबीयांनी लावला. मात्र खूप वेळ झाला तरी तिने दरवाजा उघडला नाही. तेव्हा तिच्या आईने दरवाजा तोडला.
बाथरुमचा दरवाजा तोडल्यानंतर तरुणी जमीनीवर बेशुद्धावस्थेत सापडली. तेव्हा तडकाफडकी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड़ॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिचा हार्ट रेट आणि बीपी एकदम नॉर्मल होते. मात्र रक्तातील कार्बोक्सीहीमोग्लोबीनची मात्रा अधिक वाढली होती.
डॉक्टर ऋचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्बन मोनोक्साइडमुळं कार्बोक्सीहीमोग्लोबीनची मात्रा वाढली. कार्बन मोनोक्साईड एक गंधही, रंगहीन आणि खूपच खतरनाक गॅस असते. हा गॅस बाथरुममध्ये असलेल्या गीझरमधून येतो. यामुळं बाथरुममध्ये ऑक्सीजनची मात्रा कमी होते.
डॉक्टरांच्या मते, बाथरुममध्ये गॅस गीजर लावल्याने तो परिसर हळूहळू गॅसने भरून जातो आणि व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा याची जाणीव होत नाही आणि मनुष्य बेशुद्ध होतो. वेळीच उपचार न मिळाल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
व्हिडिओत डॉक्टर पुढे सांगतात की, जर तुमच्या बाथरुममध्ये गिझर आहे तर एक एग्जॉट फॅन किंवा खिडकी लावून घ्या. जेणेकरुन गॅस बाहेर निघून जाईल.
बाथरुममध्ये गिझर आणि शॉवर एकत्र लावू नका. तसंच, गीजर बाथरुमच्या बाहेर फिट करा.
बाजारात असे CO गॅस डिटेक्टर येतात. जे गॅस लेव्हल वाढताच अलर्ट करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)