Marathi News> भारत
Advertisement

मुंबई एयरपोर्टवर भयानक प्रकार! लँडिंग करताना विमान घसरले; इंजिनचे नुकसान, 3 टायर फुटले


मुंबईत लँडिंग करताना एअर इंडिायचे विमान घसरले आहे. यामुळे इंजिनचे नुकसान झाले आहे. तर, 3 टायर फुटले आहेत. 

मुंबई एयरपोर्टवर भयानक प्रकार! लँडिंग करताना विमान घसरले; इंजिनचे नुकसान, 3 टायर फुटले

Air India Flight Kochi to Mumbai:   मुंबई एयरपोर्टवर भयानक घटना घडली आहे.  मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनलवर एअर इंडियाचे विमान घसरले.  लँडिंग करताना विमान रन वे वरुन घसरले. यामुळे इंजिनचे नुकसान झाले. विमानाचे 3 टायर फुटले आहेत. या प्रकारामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार हे विमान केरळमधील कोचीहून मुंबईला येत होते. 

अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेनंत भारत आणखी एका मोठ्या विमान अपघातातून वाचला. सोमवारी कोचीहून मुंबईला जाणारे विमान AI2744 हे मुसळधार पावसात अपघातातून थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार हे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या बाहेर गेले. त्याचे तीन टायर फुटले आणि त्याचे इंजिन खराब झाले.  पायलटने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि विमानाचे  सुरक्षितपणे लँंडिगे केले. एअर इंडियाचे हे विमान AI 2744 A320 (VT-TYA) दुर्घटनाग्रस्त होता होता वाचले. मुसळधार पावसामुळे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरुन घसरले. विमानाच्या इंजिनलाही काही नुकसान झाले असावे. प्राथमिक अहवालानुसार, खराब हवामानामुळे विमान लँडिंगनंतर लगेचच धावपट्टीवरून बाजूला गेले. यामुळे, प्रचंड दाबाने विमानाचे तीन टायर फुटले. परंतु टर्मिनल गेटपर्यंत विमान सुरक्षितपणे थांबण्यात पालयटला यश आले. आपत्कालीन बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे एअरबस A320 विमान धावपट्टी ओलांडून गेले किंवा उजव्या किंवा डाव्या बाजूला गेले. त्याच्या इंजिनजवळ गवत अडकलेले दिसत आहे. यावरून असे दिसून येते की विमानाच्या इंजिनच्या पुढच्या भागाला काही नुकसान झाले आहे. धावपट्टीलाही काही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 9.27 वाजता उड्डाण झाले आणि मुसळधार पावसात हा अपघात झाला. विमानात किती प्रवासी होते हे अद्याप कळलेले नाही.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) प्रवक्त्यांनुसार, कोचीहून छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या धावपट्टीवर उतरणारे विमानात लँडिंगच्या वेळी गडबड झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे  प्राथमिक धावपट्टी खराब झाल्यानंतर, दुय्यम धावपट्टी देखील सक्रिय करण्यात आली आहे. विमानतळावरून विमानांचे ऑपरेशन दुसऱ्या धावपट्टीवर हलवण्यात आले आहे.  विमान धावपट्टीवर लँड होताना  निसरड्या रस्त्यांमुळे वेग कमी करण्यासाठी वळसा घ्यावा लागला. तथापि, प्रवाशांनी भरलेले विमान यशस्वीरित्या उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानाची तपासणी सुरू आहे.

Read More