Terrifying Video From Hotel: अचानक चालता-बोलता हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण मागील काही काळात सातत्याने वाढताना दिसत आहे. अगदी तरुणांना आणि लहान मुलांनाही हल्ली हृदयविकाराच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. लहान वयातच हार्ट अटॅकमुळे प्राण गमावलेल्या मुलांचं प्रमाणही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अचानक येणारा हार्ट अटॅक आणि त्याचे वाढते धोके यामुळे तज्ज्ञ मंडळीही चिंतेत आहेत. अशा अवेळी आणि कोणतीही पूर्व सूचना न देता येणाऱ्या हार्ट अटॅकमुळे जागीच मृत्यू होतो. अनेकदा यासंदर्भातील धक्कादायक व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत असतात. असाच एक थक्क करणारा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या क्षणभरात एका तरुणाने प्राण गमावल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ राजस्थानमधील राजसमंदमधील एका हॉटेलमधला आहे. या हॉटेलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. हाच व्हिडीओ आता हार्ट अटॅक कधीही, कुठेही आणि कोणालाही येऊ शकतो असं अधोरेखित करत व्हायरल केला जात आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हॉटेलच्या कॅश काऊंटरजवळ उभा असल्याचं दिसत आहे. जेवण झाल्यानंतर बिल भरण्यासाठी हा तरुण उभा असताना बील भरण्याआधी काऊंटवर ठेवलेल्या छोट्या बरणीमधील बडीशेप चमचाने घेऊन खातो.
हा तरुण ग्राहक बडीशेप तोंडात टाकेपर्यंत काऊंटवरील व्यक्ती त्याला बिलचं प्रिंट काढून देते. मात्र बिल हातात घेतल्यानंतर बिल भरण्याआधीच हा तरुण जागेवर कोसळला. खाली पडताना तो आधार घेण्याचा प्रयत्न करतो मात्र बिल प्रिंटींग मशीसहीत तो खाली पडतो. काऊंटवरील व्यक्तीला नेमकं काय झालं हे समजण्याआधीच हा तरुण खाली कोसळलेला असतो. कोणतीही मदत मिळण्यापूर्वीच या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे.
Silent genocide continues in India!!
— Rohit Mishra (@RohitMishra2024) March 5, 2025
एक युवक खाना खाने के बाद होटल का बिल चुकाने काउन्टर पर जाता है और फिर बिल देखता है तभी अचानक हार्ट अटैक आकर 27 साल के युवक की मौत हो जाती है आखिर क्या कारण हैं कि लोगों की अचानक मौत हो रही है?गंभीर सवाल हैं https://t.co/XlnfjhTtHV pic.twitter.com/8VGmk87FnW
अशाच प्रकारची घटना शनिवारी, 1 मार्च रोजी 27 वर्षीय सचिन गौर नावाच्या तरुणासोबत घडली. राजसमंद येथील महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सचिनचे वडील सुरेश गौर हे पोलीस खात्यामध्ये काम करतात. सचिनसुद्धा या तरुणाप्रमाणे हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. सचिनसुद्धा कॅश काऊंटरजवळ अचानक पडला आणि त्याचा मृत्यू झाला.