Air India pilot : बेंगळुरू विमानतळावर एक विचित्र प्रकार घडला आहे. बेंगळुरूहून दिल्लीला उड्डाण करण्यापूर्वी, एअर इंडियाचा एका पायलटची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर पायलटला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी एअरलाइनला दुसऱ्या पायलटची व्यवस्था करावी लागली. एअर इंडियाने या वृत्ताची पुष्टी केली आहे.
4 जुलै रोजी हा प्रकार घडला आहे. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, 4 जुलै रोजी सकाळी आमच्या एका वैमानिकाची तब्येत अचानक बिघडली. बेंगळुरू ते दिल्ली एआय 2414 या विमानाचे ते पायलट होते. टेक ऑफपूर्वी प्रकृती बिघडल्याने ताबडतोब या पायलटला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
शुक्रवारी सकाळी बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे कॅप्टन श्रीवास्तव अचानक विमानतळावर बेशुद्ध पडले. शुक्रवारी सकाळी बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या (BLR) AI 2414 च्या उड्डाणापूर्वी ही घटना घडली. एअर इंडियाच्या वैमानिकाला बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायलटचीअचानक तब्येत बिघडल्यामुळे AI2414 चे उड्डाण उशिरा झाले.
दरम्यान, 9 एप्रिल रोजी, एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका अधिकाऱ्याचे विमान दिल्लीत उतरल्यानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विमान उतरल्यानंतर काही मिनिटांतच पायलट बेशुद्ध पडला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. डीजीसीएने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या विमान वाहतूक नियामक नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) सुरू केलेल्या ऑपरेशनल कारणांमुळे आणि खबरदारीच्या विमान तपासणीचा हवाला देत एअर इंडियाने 17 जून रोजी सहा आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली होती.