Marathi News> भारत
Advertisement

षडयंत्र रचणारे समोर आलेच पाहिजेत; देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने ही कृती असंवैधानिक ठरवत कठोर शब्द न्यायालयाने वापरले आहेत. ही एक प्रकारे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही थप्पड आहे. त्यामुळे ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी १२ आमदारांची माफी मागावी.

षडयंत्र रचणारे समोर आलेच पाहिजेत; देवेंद्र फडणवीस

पणजी : महाविकास आघाडीला कोर्टाची सणसणीत चपराक लगावली आहे. निलंबित १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. 
या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना सभागृहात षडयंत्र रचणारे कोण होते हे समोर आले पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस सद्य व्यस्त असून ते पणजी येथे प्रचारासाठी गेले आहेत. १२ आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी फडणवीस यांनी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला थप्पड असल्याचा टोला लगावला.

भाजपाच्या १२ आमदारांना षडयंत्र रचून निलंबित करण्यात आले होते. हे आमदार ओबीसी आरक्षणासंदर्भात न्याय मागण्यासाठी आवाज उठवीत होते. मात्र, जी घटना घडलीच नाही. उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी घटना घडलीच नाही त्याची कथा रचली गेली. त्या आधारावर षडयंत्र रचून या १२ लोकांना निलंबित करण्यात आलं. 

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही कृती असंवैधानिक ठरवत कठोर शब्द न्यायालयाने वापरले आहेत. ही एक प्रकारे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही थप्पड आहे. त्यामुळे ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी १२ आमदारांची माफी मागावी. तसेच, सभागृहात षडयंत्र रचणारे कोण होते हे समोर आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

Read More