Marathi News> भारत
Advertisement

तुमच्या CTC पेक्षाही जास्त आहे 'या' हॉटेलमधील Per Night Stay! भारतातच नाही तर आशियात सर्वात Best

Travel Updates : तलावाकाठी उभ्या या महालात वावरताना तुम्हाला राजा-राणीसारखं वाटेल... इथं तुमच्या सेवेत असतील अनेक सुविधा.... पाहून भारावून जाल   

तुमच्या CTC पेक्षाही जास्त आहे 'या' हॉटेलमधील Per Night Stay! भारतातच नाही तर आशियात सर्वात Best

Travel Updates : परदेशी नागरिकांप्रमाणंच आता भारतीय नागरिकांचाही कल फिरण्याकडे दिसत आहे. त्याहूनही फिरत असताना Luxury अनुभव घेण्यालाच अनेकांची पसंती. साचेबद्ध जीवनापासून दूर आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयींचा अनुभव घेणारी अनेक मंडळी तुम्ही आजुबाजूला पाहिली असतील. याच मंडळींमुळं आणि पर्यटनाचा वाढता ओघ लक्षात घेता भारतात गेल्या काही काळापासून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. देशातील Hospitaity  Industry अतिशय झपाट्यानं मोठी झाली. परिणामस्वरुप जागतिक स्तरावर भारताच्या पाहुणचारानं वाहवा मिळवली. 

नुकतंच The Leela Palaces, Hotels and Resorts च्या वतीनं The Leela Palace Udaipur हा महालवजा पंचतारांकित हॉटेलला Middle East & India मधील सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून गौरवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. 'लक्झरी ट्रॅव्हल रिलेटेड अवॉर्ड्स' (Luxury Travel Related Awards) च्या वतीनं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दुबईमध्ये पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ही घोषणा झाली आणि इथं पर्यटनप्रेमींनी या हॉटेलविषयी अनेक गोष्टी शोधण्य़ासाठी धाव मारली. 

कुठे आहे हे हॉटेल? 

राजस्थानच्या उदयपूर येथील लेक पिचोलाच्या काठावर हे हॉटेल मोठ्या दिमाखात उभं आहे. या हॉटेलला भेट दिली असता राजस्थानची संस्कृती एका क्षणात लर्षात येते. मेवाडच्या भूमीवर उभं असणारं हे हॉटेल पाहून, काय कमाल 'रॉयल कारभार' आहे असंच तुम्हीही म्हणाल. 

एका रात्रीच्या मुक्कामासाठी किती खर्च? 

द लीला पॅलेस, उदयपूरमध्ये एखाद्या खास प्रसंगी तुम्हीही राहण्याचा बेत आखत असाल तर, त्यासाठीचा खर्चही विचारात घेणं महत्त्वाचं. या हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी तुम्हाला एका रात्रीचे 49300 रुपये मोजावे लागतात. ही रक्कम Grande Heritage Lake View रुमसाठी आहे. 

हेसुद्धा पाहा : Kashi Dev deepawali: गंगाकाठ लक्ष दिव्यांनी उजळला... पाहा पंतप्रधानांनी शेअर केलेले सुरेख फोटो  

Grande Heritage Lake View with Balcony साठी तुम्हाला 51000 रुपये मोजावे लागतात. तर, लक्झरी सूटची किंमत 109000 (ब्रेकफास्टसह) रुपयांपर्यंत जाते. हॉटेलमध्ये असणाऱ्या Royal Suite साठी (ब्रेकफास्ट आणि विमानतळापासून येण्याजाण्याचा खर्च मिळून) 601,000 इतकी घसघशीत रक्कम मोजावी लागते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@theleelapalaceudaipur)

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं असणाऱ्या आणि ऐतिहासिक महत्त्वं असणाऱ्या ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये महागातला महात रुम 4 लाखांच्या घरात जातो. पण, द लीला पॅलेसमधील रुमसाठी तुम्हाला त्याहूनही जास्त रक्कम मोजावी लागू शकते. तेव्हा इथं येण्याचा बेत आखत असाल तर तसं खास कारणही शोधा, म्हणजे हा मुक्काम कायम लक्षात राहील. 

Read More