Marathi News> भारत
Advertisement

'मंगळयान' मोहिमेला आज पाच वर्षे पूर्ण

 फक्त 6 महिन्यांकरता आखलेली मंगळयान मोहीम पाच वर्षे होत असताना अजूनही सुरू

'मंगळयान' मोहिमेला आज पाच वर्षे पूर्ण

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : जगात नावाजलेल्या आणि अत्यंत स्वस्तात यशस्वी मंगळ मोहीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इसरोच्या 'मंगळयान' मोहिमेला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी 2014 ला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी मंगळयान हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहचले, मंगळ ग्रहाच्या कक्षेत फेरी मारू लागले. मंगळयानाचे प्रक्षेपण हे 5 नोव्हेंबर 2013 ला करण्यात आले होते. 

10 महिन्यांचा प्रवास करत मंगळयान अत्यंत अचुकरित्या मंगळग्रहाच्या कक्षेत स्थिरावले होते. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता.

fallbacks

सध्या मंगळयान हे मंगळ ग्रहाभोवती 421 किलोमीटर बाय 86, 993 किलोमीटर असा लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमंती करत आहे.

विशेष म्हणजे फक्त 6 महिन्यांकरता आखलेली मंगळयान मोहीम पाच वर्षे होत असताना अजूनही सुरू असून मंगळयानाची तब्बेत ठणठणीत आहे. 

Read More