Marathi News> भारत
Advertisement

'असं जगू शकत नाही...' शारदा विद्यापीठातील 21 वर्षीय विद्यार्थिनीची शिक्षकांना कंटाळून आत्महत्या

Sharda University student suicide: ज्योती शर्मा या दुसऱ्या वर्षाच्या बीडीएस विद्यार्थिनीने तिच्या वसतिगृहात आत्महत्या केली. तिच्या चिठ्ठीत प्राध्यापकांवर मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.  

'असं जगू शकत नाही...' शारदा विद्यापीठातील 21 वर्षीय विद्यार्थिनीची शिक्षकांना कंटाळून आत्महत्या

Jyoti Suicide Case: ग्रेटर नोएडामधील शारदा विद्यापीठाच्या बीडीएस दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ज्योती शर्मा हिने होस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन प्राध्यापकांवर व विद्यापीठ प्रशासनावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. गुरुग्रामची रहिवासी असलेली 21 वर्षांची ज्योती ही डेंटल सर्जरीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री उशिरा ती मृतावस्थेत आढळून आली. तिच्या खोलीतून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे ज्यात तिने तिच्या आत्महत्येचं कारण तिने सांगितलं आहे. तिच्या चिठ्ठीत तिने प्राध्यापकांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. 

काय लिहलं आहे चिठ्ठीत?

तिच्या खोलीम्हून सापडलेल्या चिठ्ठीत तिने लिहलं आहे की, "ते मला सतत त्रास देत होते. मानसिक छळ करत होते. मी खूप काळापासून या तणावात जगत होते. त्यांनीही तोच अनुभव घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यांनी तुरुंगात जायलाच पाहिजे."

विद्यार्थ्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये संताप

ही घटना समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये संताप उसळला आहे. शनिवारी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. आरोपी प्राध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

काय म्हणाले पोलीस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क परिसरात घडली. याप्रकरणी दोघा प्राध्यापकांना अटक करण्यात आली आहे. 

पालक काय म्हणाले? 

ज्योतीच्या आईने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, विद्यापीठातील प्राध्यापक सतत विद्यार्थ्यांना पास होण्याच्या बाबतीत दम देत होते. "काल सकाळी ८ वाजता मी तिच्याशी बोलले. संध्याकाळी 5.30 वाजता पुन्हा फोन केला, पण तिने उचलला नाही. प्राध्यापकांनी असाइनमेंटवर सही न करता विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती खूपच तणावात होती. आम्हाला तर तिच्या मृत्यूबद्दल विद्यापीठाने कळवले न्हवते. आम्ही न्यायाची मागणी करतो," असे तिच्या आईने सांगितले.

(टीप: आत्महत्येचे विचार त्रासदायक ठरू शकतात. पण आत्महत्या टाळता येऊ शकते. तुम्हाला मदतीची गरज असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता – वंद्रेवाला फाउंडेशन (मुंबई): +91 9999666555 (२४x७))

Read More