Marathi News> भारत
Advertisement

Friendship Day: नोकरीवर पाणी सोडत तीन मित्रांनी सुरू केला व्यवसाय; आज कमवतात एवढे पैसे

एकाचं कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांनी यशस्वी वाटचाल

Friendship Day:  नोकरीवर पाणी सोडत तीन मित्रांनी सुरू केला व्यवसाय; आज कमवतात एवढे पैसे

मुंबई : आयुष्यात चांगल्या-वाईत प्रसंगात कोणताही विचार न करता पुढे धावून येतात ते म्हणजे मित्र. आजच्या या मैत्रीच्या दिवशी आम्ही तुम्हाला तीन मित्रांची यशस्वी गोष्ट सांगणार आहोत. हे तीन मित्र एकाचं रूममध्ये राहत होते. एकाचं कंपनीमध्ये काम करत होते. पण त्यानंतर तिन्ही मित्रांनी आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला. आज हे तीन मित्र नोएडामध्ये व्यवसाय करत आहेत आणि त्यातूम प्रचंड पैसे कमावत आहेत. 

या तीन मित्रांचं नाव आहे, टिकेन्द्र, प्रतीक आणि संदीप. यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरूवात  2015 साली केली. आपण एखादा निर्णय घेतो त्यामागे अनेक कारणं असतात. या तीन मित्रांच्या व्यवसायामागे देखील एक कारण आहे. तिघेही एके दिवशी प्रवासाला निघाले होते. तेव्हा रस्त्यात त्यांच्या गाडीचं इंधन संपलं.

दूरपर्यंत पेट्रोल पंप नव्हता. तेव्हा तिघांना वाटलं आपण ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणी आपल्याला इंधन मिळालं तर?  फक्त हाच एक विचार आणि तिघांनी यावर काम करण्यास सुरूवात केली. आज त्यांच्या कंपनीचा टर्नओ्व्हर जवळपास 100 कोटी रूपये आहे. 

कसा सुरू झाला प्रवास? 
टिकेन्द्र आणि संदीप नोएडास्थित टेक कंपनी सॅमसंगमध्ये काम करायचा. त्याचवेळी प्रतीक अॅक्सिकॉममध्ये काम करायचा. प्रतीक आणि टिकेंद्र रूममेट होते. एके दिवशी तिघेही दिल्लीच्या बाहेर फिरायला गेले होते, तेव्हा रस्त्याच्या मधोमध इंधन संपले. त्यांना वाटेत 10 किमीच्या आसपास एकही पेट्रोल पंप सापडले नाही.

त्याचवेळी, त्यांनी ऑनलाइन डिझेलचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये पेपफ्यूल डॉट कॉम (startup Pepfuel.com) नावाची कंपनी सुरू केली. तीन मित्रांच्या कंपनीला सरकारने देखील मान्यता दिली आहे.  या ऍपवर ग्राहक ऑनलाइन किंवा मेसेजद्वारे इंधन ऑर्डर करू शकतात.

Read More