Marathi News> भारत
Advertisement

हिमस्खलनामुळे काश्मिरमध्ये ३ जवान शहीद

कुपवाडासहित अनेक ठिकाणी हवामान विभागाने २ दिवसांपूर्वीच हिमस्खलनाचा इशारा दिला होता.

हिमस्खलनामुळे काश्मिरमध्ये ३ जवान शहीद

श्रीनगर :  काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले आहेत. काश्मिर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यात माछील भागात हिमस्खलनामुळे दरड कोसळली, यात ३ जवान शहीद झाले, तर २ गंभीर जखमी झाला आहे. कुपवाडासहित अनेक ठिकाणी हवामान विभागाने २ दिवसांपूर्वीच हिमस्खलनाचा इशारा दिला होता. 

तातडीने मदतकार्य, जवानांना बाहेर काढले 

लष्कराने तातडीने मदतकार्य करून या जवानांना बाहेर काढले.  मात्र आज माछील भागात लष्कराच्या चौकीवरच हिमकडा कोसळला आणि हवालदार कमलेश सिंह, नायक बलबीर आणि शिपाई राजिंद्र हे बर्फाखाली दबले गेले. 

इतर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू

मात्र तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता, तर इतर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एक जवान जखमी असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.  डिसेंबरमध्येही कुपवाडा व बांदिपोरा भागात हिमकडे कोसळून ५ जवान शहीद झाले होते.

Read More