मुंबई : वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजतो दात, असं आपण अनेक वेळा ऐकलं असेल, वाचलं असेल, पण प्रत्यक्षात वाघाच्या जबड्यात किती शक्ती असते, ते एका व्हिडीओतून दिसून आलं आहे. (व्हिडीओ बातम्याच्या खाली जोडलेला आहे, पाहा) हा व्हीडीओ कर्नाटकातील बंगळुरुमधील बाणेरघाट पार्कचा असल्याचा दावा ट्ववीट करताना एका मुलीने केला आहे. हा व्हीडीओत वाघाने आपल्या जबड्याने पर्यटकांची गाडीच मागे खेचली आहे.
हा व्हीडिओ पाहताना तुम्हाला कल्पना येईल की, वाघाच्या जबड्यात किती पावर असते. खालील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या थरार नक्कीच पाहण्यासारखा आहे. पर्यटकांची गाडी मागे खेचल्याचं पाहिल्यावर तुम्हाला वाघाच्या जबड्यात किती शक्ती असते याचा नक्कीच अंदाज येईल.
Tiger pulling tourist vehicle in Bannerghatta park , Bengaluru
— Mona Patel (@MonaPatelT) January 15, 2021
Recieved on whatsapp pic.twitter.com/TfH8mAiN2b