Tigress Attacks Leopard Video : सोशल मीडियामुळे कोणाच्या आयुष्यात काय सुरु आहे किंवा कोणत्या देशात काय होतंय हे आपल्याला कळतं. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणत्या जंगलातील प्राण्याचे तर कधी काय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे कारण या व्हिडीओत असं काही पाहायला मिळत आहे जे कधी घडेल असं कोणाला वाटलं देखील नव्हतं.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांचा आहे. ते जंगलात कसे राहतात त्यांचा इथे असलेला प्रत्येक क्षण कसा राहतो, ते कसे त्यांच्या जगण्यासाठी लढतात हे दाखवलं आहे. पेंचच्या जंगलातील एका बिबट्याची वाघाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठीची धडपड ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मध्य प्रदेश मध्ये असलेलं पेंचचं जंगल हे सगळ्यांनात माहित आहे. तिथे किती विविध प्राणी आपल्याला पाहायला मिळतात याविषयीचे अनेक व्हिडीओ आपण अनेकदा पाहतो. आता या व्हायरल झालेला व्हिडीओ हा पेंचच्या तुरिया गेट जवळचा आहे.
झाडावर बसलेल्या बिबट्यावर लक्ष्मी नावाची वाघीण हल्ला करताना पाहायला मिळत आहे. बिबटा एका झाडावरून खालती जमिनीवर उडी मारतो आणि धावत जीवाच्या आकांताने दुसऱ्या झाडावर चढतो. दरम्यान, त्याचा पाठलाग करत लक्ष्मी वाघीण पण त्याच्यामागे झेप घेते आणि झाडावर बऱ्याचवर पर्यंत चढते. असा हा थरारक व्हिडिओ आहे. झी 24 तास वर याचे आपण exclusive दृश्य बघू शकतो.
काल सकाळी तुरिया गेटवरून जंगलात गेलेल्या पर्यटकांना हे थरारक दृश्य पाहता आले. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी वाघिणीला तीन बछडे होते पण गेल्या काही दिवसात जंगलात तिच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. या बिबट्याचा वावर लक्ष्मी वाघिणीच्या तिसरा बछडा ज्या परिसरात आहे तिथे होता. त्यामुळे आपल्या परिसरातून बिबट्याला हुसकावण्याकरता लक्ष्मी वाघणीनं या बिबट्यावर हल्ला केला. दरम्यान, हे सगळं थक्क करणारं दृश्य कॅमेरात कैद झालं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस उतरत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळत आहे.