Marathi News> भारत
Advertisement

महिला खासदाराने दिला मुलीला जन्म, नाव ठेवले कोरोना

खासदाराच्या मुलीला नाव दिलं कोरोना

महिला खासदाराने दिला मुलीला जन्म, नाव ठेवले कोरोना

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट वाढत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. घराबाहेर पडण्यासाठी लोकांना मनाई आहे. भारतात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच टीएमसीच्या एका महिला खासदाराने मुलीला जन्म दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे या मुलीचं नाव कोरोना असं ठेवण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात जन्मलेल्या या मुलीचं उपनाव कोरोना ठेवण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार अपरूपा पोद्दार आई झाल्या आहेत. त्यांनी आपल्या मुलीचं उपनाव कोरोना ठेवलं आहे. अपरूपा दुसऱ्यांदा आरामबाग मधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

fallbacks

अपरूपा यांनी मुलीचं उपनाव कोरोना ठेवण्याचं ठरवलं. जग कोरोनाशी लढत असताना या मुलीचा जन्म झाल्यामुळे त्यांनी तिचं उपनाव कोरोना ठेवलं आहे. 

महत्त्वाचं म्हणजे अपरूपा यांचे देखील २ नावं आहेत. अपरूपा पोद्दार यासह त्या आफरीन अली म्हणून देखील ओळखल्या जातात. अपरूपा याचे पती शकीर अली यांनी म्हटलं की, 'आमच्या येथे मुलीचा जन्म झाला आहे. हे आमचं दुसरं अपत्य आहे. ती कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू असल्याचं तीचं उपनाव कोरोना असेल.'

पण मुलीचं मुख्य नाव ठेवण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे नाव सुचवण्याची विनंती केली आहे. मुलीचं नाव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुचवण्यावरुन ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read More