Marathi News> भारत
Advertisement

बुलेटप्रुफ गाडी, SWAT कमांडो; तहव्वूर राणा भारतात येताच अशी असणार सुरक्षा

 Tahawwur Rana: भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईवर झालेल्या 26/11 या भ्याड दहशतवादी हल्ल्यामागचा खरा सूत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणलं आहे. 

बुलेटप्रुफ गाडी, SWAT कमांडो; तहव्वूर राणा भारतात येताच अशी असणार सुरक्षा

Tahawwur Rana: मुंबईतील  26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी तहव्वूर राणाला काहीच तासांत भारतात आणण्यात येणार आहे. भारतात प्रत्यार्पण करताना सुरुवातीला अमेरिकेहून येणारे विमान दिल्ली विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरुन 26/11 च्या हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांना न्याय मिळणार आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणादरम्यान दिल्लीसह मुंबईत कटेकोड सुरक्षा ठेवण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर तहव्वूर राणाला थेट NIA च्या मुख्यालयात नेण्यात येणार आहे. या दरम्यान, तेथे मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. NIA मुख्यालयात तहव्वूर राणांची अनेक मोठे अधिकारी  चौकशी करु शकतात. त्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात येणार असून त्याला कोठडीत सोपवण्यात येईल. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळाला छावणीचे स्वरुप आले आहे. विमानतळाच्या बाहेर आणि आतदेखील SWAT कमांडोंबरोबर विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. तहव्वूर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच SWAT त्याच्याभोवती सुरक्षेचे कडे करुन गाडीत बसवण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला SWAT कमांडोंनी विमानतळाबाहेर आणल्यानंतर लगेचच त्याला एका बुलेटप्रुफ गाडीत बसवण्यात येणार आहे. या गाडीभोवतीदेखील तीन स्तरीय सुरक्षा असणार आहे. तहव्वूरच्या प्रत्येक हालचालीवर सुरक्षा विभाग आणि कमांडोची नजर असणार आहे. 

Read More