Marathi News> भारत
Advertisement

भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैनिकांना मोठं यश मिळालं आहे. इथे सीआरपीएफ आणि आर्मीच्या एकत्र केलेल्या कारवाईत भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैनिकांना मोठं यश मिळालं आहे. इथे सीआरपीएफ आणि आर्मीच्या एकत्र केलेल्या कारवाईत भारतीय सैनिकाकडून  सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांविरोधात सध्या ऑपरेशन सुरु आहे. आज सकाळी उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करणा-या  सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांकडून घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं आहे. उरीच्या दुलंजामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अंधाराचा फायदा घेऊन जैशचे दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. 

Read More