Traffic Rules: वाहतूक नियम तोडल्यावर तुम्हाला चलान जारी केले जाते. त्याद्वारे वाहतूक नियम तोडल्याचा दंड तुम्हाला भरावा लागतो. अनेक गाड्यांवर असे अनेक चलान जारी असतात. लोकअदालतीमध्ये तुमच्या प्रलंबित ट्रॅफिक चलनातून तुम्हाला दिलासा मिळतो. न्यायालयात जवळजवळ सर्व ट्रॅफिक चलन माफ केले जातात. पण काही चलान असे असतात ज्यांवर कोणतीही सवलत दिली जात नाही. वर्षानुवर्षे वाहन चालवणाऱ्या अनेकांना एकतर लोकअदालतबद्दल माहिती नसते. तसेच अनेकांना लोकअदालतमध्ये कोणत्या चलानला माफी नसते? याबद्दलही फार कमीजणांना माहिती असते. रेड सिग्नल तोडल्यास जारी केलेले ट्रॅफिक चलान लोकअदालतीत माफ करता येते की नाही? लोकअदालतची नोंदणी प्रक्रिया काय असते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तुमचे चलान माफ करण्यासाठी लोकअदालतीत जाण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तुम्हाला ट्रॅफिक चलान जिथे जारी करण्यात आले होते त्याच ठिकाणाच्या लोकअदालतीत हा खटला निकाली काढता येतो. यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक असते. या कागदपत्रांमध्ये चलनाची प्रत, वाहनाची कागदपत्रे आणि ओळखपत्र यांचा समावेश आहे. लोकअदालत सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी तुम्ही पोहोचणे आवश्यक असते. अन्यथा तुमचे चलानही ऐकू येणार नाही.
लोकअदालतमध्ये गेल्यावर तुमची पूर्ण चलानमाफी होऊल या भ्रमात राहू नका. कारण लोकअदालतीमध्ये ट्रॅफिक चलन पूर्णपणे माफ केले जात नाही. तुमचे चलन रद्द केले जाऊ शकते किंवा त्यावर आकारण्यात येणारा दंड कमी केला जाऊ शकतो. येथे मूलभूत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जारी केलेले चलन माफ किंवा कमी केले जाऊ शकते. यामध्ये सीट बेल्ट न लावल्याबद्दल जारी केलेले चलन, लाल दिवा तोडल्याबद्दल जारी केलेले चलन, चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवल्याबद्दल जारी केलेले चलन किंवा हेल्मेट न घातल्याबद्दल जारी केलेले चलन यांचा समावेश आहे
सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) च्या अधिकृत वेबसाइट nalsa.gov.in वर जा.
येथे Apply Legal Aid पर्यायावर जा आणि त्यावर क्लिक करा.
यानंतर विनंती फॉर्म भरा.
सर्व आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्र योग्यरित्या अपलोड करा.
मग फॉर्म सबमिट करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर टोकन नंबर आणि अपॉइंटमेंट लेटर तुमच्या मेलवर पाठवले जाईल.
तुम्हाला हा टोकन नंबर, नियुक्ती पत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह नियोजित वेळी लोकअदालतीत पोहोचवावा लागेल.