IRCTC Kashi Vishwanath Ramlalla Tour Package: भारतात तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणाऱ्या पर्यटन आणि दर दिवसागणिक त्या भागांमध्ये वाढणारी गर्दी पाहता विविध मार्गांनी या ठिकाणांचा विकास करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी अशाच एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठीच्या बेतात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही निवांत आणि तितकेच अध्यात्मिक क्षण शोधणाऱ्यांसाठी आयआरसीटीसीनं एक खास टूरचा बेत आखला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टूरच्या माध्यमातून अशा ठिकाणांचा बेत आखण्यात आला आहे, जिथं पोहोचण्यासाठीच्या खर्चाची चिंतासुद्धा दूरच राहणार आहे. IRCTC कडून अतिशय विश्वासार्ह अशा या टूरची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये बहुचर्चित अशा तीर्थक्षेत्रांना सहज भेट देता येणार आहे.
IRCTC च्या या नव्या फ्लाईट टूरचं नाव KASHI VISHWANATH - RAMLALLA DARSHAN EX GUWAHATI असं असून, EGA038A असा या टूरचा कोड आहे. 12 जुलै 2025 पासून गुवाहाटी इथून या टूरची सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये 4 रात्री आणि 5 दिवसांचा प्रवास समाविष्ट असेल. या प्रवासात अयोध्या, लखनऊ, प्रयागराज आणि वाराणासी असे टप्पे असतील. ज्यामध्ये विमान प्रवासानं गुवाहाटी ते लखनऊ असा प्रवास होणार असून, त्यापुढील प्रवास कॅब आणि बसच्या माध्यमातून केला जाईल असं आयआरसीटीसीकडून सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रवासामध्ये राहण्याचा, मुक्कामाचा, स्थानिक प्रवासाचा आणि खाण्याचा खर्च आयआरसीटीसी करणार असून गाईडसुद्धा विविध ठिकाणांची माहिती देण्यासाठी हजर असेल. या सहलीमध्ये टूर इंन्श्योरन्सचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
या सहलीसाठी एकट्यानं जायचा बेत असेल तर, 36520 रुपये इतका खर्च असेल. तर, दोन व्यक्ती जाण्याचा बेत असेल तर माणसी 30200 रुपये इतका खर्च असेल. तिघांनी मिळून हा प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर माणसी 29400 रुपये इतका खर्च येईल. यामध्ये विमान प्रवासाचं तिकीट, मुक्काम, ब्रेकफास्ट, लंच, डिनर यासह स्थानिक प्रवासाचाही समावेश आहे.
IRCTC चं अधिकृत संकेतस्थळ किंवा नजीकच्या कोणत्याही टूरिजम सेंटरच्या माध्यमातून या सहलीचा बेत आखता येतो. या सहलीसाठींची आसनक्षमता मर्यादित असल्या कारणानं त्याचं बुकिंग करण्यासाठी घाई करा बरं...