Marathi News> भारत
Advertisement

Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'

Love Marriage  :  हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे. 

Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'

Disha Vakani Life :  उत्तर प्रदेशातून हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. या मुस्लिम तरुणीने धर्मांतर करत प्रियकऱ्यासोबत मंदिरात सात फेरे घेतले आहेत. इलमा खानपासून ही तरुणी आता सौम्या शर्मा झाली आहे. बरेलीमधील ऑगस्ट मुनी आश्रमात पंडित केके शंखधर यांनी या दोघा लव्ह बर्डचं संपूर्ण हिंदू विधी आणि मंत्रोच्चारासह लग्न केलं. या विवाहनंतर सौम्याचा जीवाला धोक्या असल्याचं सांगत तिने संरक्षणाची मागणी केली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी घरातून पळाली होती तरुणी

मिळालेल्या माहितीनुसार तरुणी दोन महिन्यांपूर्वी घरातून पळून आली होती. मुलीचं म्हणं आहे की, ती 19 वर्षांची असून ती आता कायम हिंदूच राहणार आहे.  इलमा उर्फ सौम्या ही उत्तर प्रदेशातील बिलसीमधील रहिवाशी आहे. सौम्याने तिच्याच गावातील सोमेश शर्मा या तरुणाशी पळून जाऊन लग्न केलं आहे. तरुणीने स्पष्ट केलं की, तिने तिच्या मर्जीने हिंदू धर्म स्वीकारला आहे. (trending muslim girl converted to hindu and married her lover up bareilly marathi news)

5 वर्षांपासून प्रेम प्रकरण

सौम्या आणि सोमेश एकमेकांना 5 वर्षांपासून प्रेम करतात. पण मुलगी मुस्लिम आणि मुलगा हिंदू असल्याने त्यांच्या नात्यामध्ये अडचणी येतं होत्या. अखेर मुलीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना त्यांचा प्रेमाबद्दल कळल्यामुळे कुटुंबियांनी तिला दहावीनंतर शिक्षण घेण्यापासून रोखले होते. मात्र सौम्याला अजून शिकायचं होतं. शाळेत असताना या दोघांची मैत्री झाली नंतर त्यांच्यामध्ये प्रेम झालं. 

नवरा जिथे ठेवेल तिथे राहिल

सौम्याने सोमेश याचा नवरा म्हणून स्वीकार केला असून तो जिथे ठेवेल तिथे राहण्याचा निर्णय सौम्याने घेतला आहे. खरं तर बिलसीमधील सोमेश आणि इलमा यांच्या घरांमध्ये किमान 500 मीटरचच अंतर आहेत. दरम्यान सोमेश सध्या दिल्लीत खासगी नोकरी करतो. सौम्याने सांगितलं आहे की, तिला इस्लाम धर्मातील तिहेरी तलाक आवडत नाही. त्यामुळे मला हिंदू धर्म सुरक्षित वाटतं. शिवाय तिच्या बहिणीचा लग्नानंतर खूप छळ झाला, त्यामुळे मला कायम भीती वाटायची. दरम्यान मुलीने सांगितले की, लग्न झाल्यानंतर माझ्या घरचे मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. 

Read More