Marathi News> भारत
Advertisement

हत्तींनी गटकली पहिल्या धारेची, टून हत्तींना उठवण्यासाठी ग्रामस्थांनी बडवले ढोल, पाहा पुढे काय झालं

देशी दारू प्यायले आणि तब्बल 24 हत्ती झोपले, ग्रामस्थ हैराण वन विभाग झालं परेशान

हत्तींनी गटकली पहिल्या धारेची, टून हत्तींना उठवण्यासाठी ग्रामस्थांनी बडवले ढोल, पाहा पुढे काय झालं

Trending News : भारतातील अनेक भागांमध्ये मोहाच्या फुलापासून मद्य बनवलं जातं. याला मोहाची दारू असं देखील बोलतात. मुख्यतः भारतातील विविध आदिवासी भागांमध्ये मोहाची दारू बनवील जाते. आदिवासी भागातील पुरुष आणि महिला याचं सेवन करतात. 

अनेकांना दारूचं व्यसन असतं. दारू पिण्यासाठी कोणतंही निमित्त चालतं, मग ते आनंदाच्या असो की दु:खाचा क्षण असो. पण माणूसच नव्हे तर प्राण्यांना दारू प्यायला आवडते असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवणं कठिणच. पण हे खरं आहे. हत्ती हा एक असा प्राणी आहे ज्याला दूरवरुन मद्याचा वास येतो. हत्ती मद्य कुठे आहे याचा शोध घेत मद्यापाशी पोहोचतात. यातही हत्तींना मोहाची दारू मिळाली तर बातच काही औरच. 

जंगलात फिरत असताना हत्तींना मोहाच्या मद्याचा वास आला तर त्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचतात. असा एकप्रकार समोर आला आहे. तब्बल 24 हत्ती मोहाची दारू पिऊन गाढ झोपले. ही घटना ओडिशातील क्योंझर जिल्ह्यातील एका गावातली आहे. इथं तब्बल दोन डझन हत्तींनी शैलीपाडा काजू जंगलाजवळ मोहाची दारू गटकली आणि तिथेच झोपून गेले. 

क्योंझर जिल्ह्यातील शिलीपाडा काजू जंगलाजवळ राहणारे लोकं पारंपरिक पद्धतीने मोहाची दारू बनवतात. ही दारू बनवण्यासाठी इथले नागरिक जंगलात जातात. पारंपरिक पद्धतीने या मोहाच्या फुलांची दारू बनवण्यासाठी मोठाल्या भांड्यांमध्ये पाण्यात ही फुलं ठेवली होती. जेंव्हा ग्रामस्थ सकाळी 6 वाजता तिथे पोहोचले, तेंव्हा त्यांना सर्व भांडी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. काही भांडी मोडकळीस आलेली. त्यातील पाणीही गायब असल्याचं पाहायला मिळालं. सोबतच त्यांना आसपास तब्बल 2 डझन हत्ती पडलेले पाहायला मिळाले. याठिकाणी 9 नर, 6 मादा आणि 9 छोटे हत्ती पडले होते.

अर्धवट तयार झालेलं मद्य
ग्रामस्थांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. मोहाच्या फुलांची दारू तयार करण्याची  सुरुवातीच्याच टप्यात होती. ग्रामस्थांनी या हत्तींना उठवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र काही केल्या हत्तींना जाग आली नाही. यानंतर ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. हत्तींना जागं कारण्यासाठी ढोल वाजवले गेले. वन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर कसा बसा हत्तीचा कळप जागा झाला आणि तिथून निघून गेला. 

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
हत्तींना जागं केल्यानंतर हत्ती पुन्हा जंगलात निघून गेले. मात्र त्यांनी मोहाची तयार होणारी दारू पिण्याबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही. त्यांनी सांगितलं की कदाचित हत्ती तिथे आराम करत असतील असं अधिकारी म्हणाले.

Read More