Marathi News> भारत
Advertisement

एक विवाह असा पण! ! 'या' राज्यात आजही संपन्न होतो एक 'अनोखा विवाह' सोहळा

या विवाह सोहळ्याबद्दल जाणून तुम्ही पण आर्श्चयचकित व्हाल.

एक विवाह असा पण! ! 'या' राज्यात आजही संपन्न होतो एक 'अनोखा विवाह' सोहळा

Trending News : भारतात विवाह सोहळ्या हो खूप महत्त्वपूर्ण आणि पवित्र विधी मानला जातो. लग्न हे दोन जीवांची रेशीमगाठ तर दोन कुटुंबाचं एकत्र येणं. या लग्न सोहळ्यात अनेक विधी असतात. प्रत्येक राज्यात हे लग्न विधी वेगवेगळे असतात. मात्र भारतातील एका राज्यात एक अनोखा विवाह सोहळ्या संपन्न होतो. सोशल मीडियावर एका यूजरने या विवाह सोहळ्याबद्दल माहिती दिली आहे. हा विवाह सोहळामध्ये वधूवर नसतात. मग नेमकं कोण असतं ते आपण जाणून घेणार आहोत. या विवाह सोहळ्याबद्दल जाणून तुम्ही पण आर्श्चयचकित व्हाल. या विवाहचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 


मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात 'लग्न'

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न होतं आहे.  या लग्नाचं वैशिष्ट्यं म्हणजे मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात लग्न लावण्यात येत आहे. तुम्हाला ऐकून आणि पाहून जरा गंमतीशीर वाटेल. पण या लग्नातील विधी पूर्णपणे कोणत्याही सामान्य लग्नासारखे असतात. वराती, दोन्हीकडील पाहुणे, लग्नाचे विधी अगदी गोडाचे जेवणसुद्धा असतं.  मृत्यूच्या 30 वर्षांनंतर लग्न मग हे लग्न कोणाचं आहे आणि का लावलं हे लग्न? याबद्दल आपण जाणून घेऊयात. 


'प्रेथा कल्याणम' प्रथा 

कर्नाटक आणि केरळमध्ये प्रेथा कल्याणम' (Pretha Kalayanam)नावाची ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जन्माच्या वेळी मृत्यू आलेल्यांसाठी हा विवाह सोहळ्याचा विधी करण्याची या राज्यांमध्ये परंपरा आहे. हा विवाह सोहळा म्हणजे आत्म्याच्या सन्मान करणे, असं कर्नाटक आणि केरळमधील स्थानिक लोक मानतात. 

वधू-वरांऐवजी 'यांचं' होतं लग्न 

'प्रेथा कल्याणम' हा एक मृतांचा विवाह आहे हे तुम्हाला कळलं असेल. तर या व्हिडीओमधील विवाह कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील शोभा आणि चंदप्पा यांचा विवाह आहे. या दोघांचा जन्माच्या वेळीच मृत्यू झाला होता. आज 30 वर्षांनंतर सगळ्या विधी आणि परंपरेने त्यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाट्यात पार पडला. हा विवाह सोहळा म्हणजे दोन पुतळ्याचं विवाह असतो. 


अनोख्या विवाह सोहळा शेअर

यूट्यूबर अॅनी अरुण या यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर 28 जुलैला शेअर केला आहे. या विवाह सोहळ्याबद्दल अॅनी अरुण सांगतो की, ''हे लग्न पाहिल्यावर बिलकुल वाटत नाही की हे पुतळ्याचा विवाह सोहळा आहे. सर्वसामान्य लोकांचे लग्न होतात अगदी तसाच थाट या लग्नात पाहिला मिळतो.''

Read More