नात्यावरील विश्वास तुटणारी घटना नुकतीच समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमधील मुलीचं लग्न 9 दिवसांवर असताना आई जावयासोबत पळून गेली. या विचित्र प्रेम कहाणीचा भांडाफोड खुद्द महिलेच्या नवऱ्याने केला आहे. सासरे जितेंद्र कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाबद्दल जावयाविरोघात पोलिसांकडे एफआयआर दाखल केली आहे. बायको आणि जावयाच्या प्रेम कहाणीची सगळी बातबीती सासऱ्याने पोलिसांनी सांगितली. जितेंद्र कुमार यांनी माध्यमाला सांगितलं की, सासू दररोज जावयाशी 15-15 तासांपेक्षा जास्त वेळ बोलत होती.
पुढे जितेंद्र कुमार म्हणाले की, माझ्या पत्नीने मला तिच्या बहिणीकडे म्हणजे माझ्या मेव्हणीकडे मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी पाठवलं होतं. येत्या 16 एप्रिलला मुलीचं लग्न होतं. त्यामुळे लग्नाची पत्रिका वेळे देणं गरजेचे होतं. मेव्हणीला लग्नाची पत्रिका देऊन मी घरी आलो तेव्हा मला माझी बायको कुठेही दिसली नाही. तिचा शोध घेतल्यावरही ती कुठे सापडली नाही. काही काळासाठी असं वाटत होतं की ती एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली असेल. पण नातेवाईकांच्या ठिकाणी चौकशी करूनही तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही तेव्हा माझा संशय अधिक वाढला.
यानंतर मी फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यानंतर असे समोर आले की, ती तिच्या भावी जावयाशी तासनतास बोलत होती. या प्रकरणात, जेव्हा भावी जावयाला बोलवलं तेव्हा तो म्हणाला की, तुम्ही 20 वर्षांपासून एकत्र राहत आहात, तुम्ही त्यांना त्रास देत राहिलात, पण आता ते विसरून जा.
जितेंद्र कुमार यांनी पुढे सांगितलं की, मी गावात राहत नाही, मी बेंगळुरूमध्ये राहतो आणि काम करतो. घरी आल्यावर मला कळलं की माझी बायको तिच्या होणार्या जावयाशी खूप जास्त बोलते. मलाही त्यांच्या नात्याबद्दल शंका होती. कारण भावी जावई मुलीपेक्षा पत्नीशी जास्त बोलायचा. घरातून पळून जाताना तिने 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपयांचे दागिनेही पळवून नेले.
जितेंद्र यांची मुलगी शिवानी ही म्हणाली की, आमची आई घरातून पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली आहे. ज्या मुलाशी मी लग्न करणार होतो त्याचा सोबत माझी आई पळून गेली. आम्हाला आमचे सामान परत मिळाले पाहिजे. तो जगतो की मरतो हे आपल्याला काही फरक पडत नाही.
दरम्यान पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला असून ते म्हणणे आहे की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून त्यात फसवणूक, विश्वासघात आणि मालमत्तेची चोरी यासारखे गंभीर पैलू आहेत. पोलीस स्टेशन प्रभारी म्हणाले की, तक्रार मिळताच आम्ही महिला आणि तरुणाचा शोध सुरू केला आहे. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कुटुंबाने दिलेल्या जबाबांच्या आधारे विभाग जोडले जात असून लवकरच ते दोघे आपल्याला सापडतील.