Marathi News> भारत
Advertisement

Trending Video 2022: व्वा उस्ताद! चिमुकलीचं गाणं ऐकून तुम्हीही द्याल दाद

या व्हिडीओमधील मुलाचा उत्साह बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

Trending Video 2022: व्वा उस्ताद! चिमुकलीचं गाणं ऐकून तुम्हीही द्याल दाद

Trending Singing Video 2022: ज्या घरात लहान मुलं असतं तिथे कायम एक आनंदाचं वातावरण असतं. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. त्यामुळे लहान मुलांचे प्रश्न, त्यांच्या करामती अगदी त्यांची एखादी विशिष्ट कला सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावर आपण लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहत असतो. काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. 

असाच एक प्रतिभाशाली मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान पाहिला जातो आहे. या व्हिडीओमधील मुलाचा उत्साह बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. लहान मुलांसाठी घरातील मोठी मंडळी हे आयडियल असतात. मोठी मंडळी जशी वागता, बोलतात त्याचं अनुकरण ही मुलं करतात. या व्हिडीओमधील छोट्याशा चिमुरडीने वडिलांची हूबेहूब निकाल काढली आहे. (trending singing video girls singing song of bollywood  viral video on social media )

व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती "कबीर सिंग" चित्रपटातील "कैसे हुआ" गाणे गिटार वाजवत गाताना दिसत आहे. त्यांच्यासमोर एक लहान मुलगी बसली आहे, तिचे वय तीन वर्षांच्या आत असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या माणसासमोर बसली आहे. तिने पण हातात एक गिटार घेतलं आहे. आता वडिलांसोबत ही चिमुकली मोठ्या उत्साहात गाणं गाताना दिसत आहे. 

शिवानी राय (@blinking_hasi) नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्या लहान मुलीला गाण्याचे संपूर्ण बोल आठवत नाहीत. यामुळेच हा व्हिडिओ अजून खास बनतो. 21 ऑगस्टला पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 70 हजार वेळा पाहिला गेला आहे. 

 

Read More