Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : भररस्त्यात तरुणीचा हाय वोल्टेज ड्रामा, 'प्यार में मिला धोखा' म्हणत कारवर चढून हंगामा

Girl Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांचा हौश उडाले आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीने जो काही तमाशा केला आणि त्यानंतर झालेली वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते.

Viral Video : भररस्त्यात तरुणीचा हाय वोल्टेज ड्रामा, 'प्यार में मिला धोखा' म्हणत कारवर चढून हंगामा

Girl Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल (Social media Video) होईल याचा काही नेम नाही. सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओने (Shocking video) नेटकऱ्यांचा हौश उडाले आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीने जो काही तमाशा केला आणि त्यानंतर झालेली वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते. (trending video)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. तुम्हाला वाटेल ती तरुणी मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य करत असेल तर नाही...तिने जो काही रस्त्याच्या मधोमध वाहनांची ये जा सुरु असताना ड्रामा केला त्यानंतर लोकांच्या तर अक्षरश: नाकी नऊ आले होते. 


हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. ती तरुणी रस्त्यात आरडाओरडा करत चारचाकी गाडी थांबवते. एवढचं नाही तर रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीची दुचाकी थांबवून ती हिसकावून घेते आणि त्यावर बसून शिवीगाळ करते. त्याचा या तमाशामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना नाहक त्रास होत होता. (trending video gwalior girl high voltage drama on road Video  viral on Social media )

काही वेळाने तिने रस्त्यावरील पोलिसांचं बॅरिगेट्स पाडलं. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. ती इथेच थांबली नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या पुढच्या काचेवर जाऊन ती बसते...त्यामुळे त्या वाहनधारकाला गाडी चालविण्यास त्रास होतो. तिच्या या कृत्यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. 

काही वेळानंतर तिथे काही महिला आल्या त्यांनी तिला कारवरुन उतरण्यास सांगितले तरीही ती ऐकतं नव्हती. ती कोणालाही जुमानत नव्हती. बऱ्याच वेळ रस्त्यावर या तरुणीचा हाय वोल्टेज ड्रामा चालू होतो. शिवीगाळ करत ती ओरडाओरडी करत होती. तिने कारच्या ड्रायव्हरवर हल्लाही केला. 

अखेर त्रासलेल्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केल्यानंतर त्या तरुणीला रस्त्याच्या एका बाजूला बसविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार ती तरुणी मानसिक रुग्ण होती आणि तिला प्रेमात धोका मिळाला असावा असा लोकांचा अंदाज होता. 

ही घटना ग्वालीयरमधील असून तरुणीचा हा ड्रामा लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जवळपास तासभर तरुणी रस्त्याच्या मधोमध हंगामा करत होती. ट्वीटरवर Sushil Kaushik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

 

Read More