Marathi News> भारत
Advertisement

Video : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...

Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे. 

Video : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...

Trending Video : सोशल मीडियाच्या (Social media) जमान्यात जो तो आज मास्टरशेफ बनला आहे. कारण या सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्म यूट्यूबवर (YouTube) हॉटेल (Hotel), ढाबा (dhaba), रेस्टॉरेंट (restaurant) स्टाईल अगदी पारंपरिक पदार्थांची रेसिपी शिकवणारे व्हिडिओ (Recipe Video) पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर तडका दालचा (Dal Tadka) एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

तो डाळीला फोडणी द्यायला गेला अन् मग...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण मुलगा स्वयंपाक (cooking video) घरात दिसतं आहे. त्याचा बाजूला मोठ्या पातेल्यात दाल आहे. आता तो त्या डाळीवर मास्टरशेफ (Masterchef) सारखी फोडणी द्यायला जातो. मस्तपैकी गॅसवर तडकेची तयारी करतो आतो तो डाळीला फोडणी द्याला गेला अन् मग...

फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी

झालं ना लोचा, तो डाळीला फोडणी द्यायला गेली आणि जोरदार भडका उडाला. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओ एका हॉस्टेलमधील आहे. त्याच्या फोडणीनंतर असं वाटलं की जणू काही बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेनंतर लोक भीतीनं इकडेतिकडे पळू लागली. (Trending Video masterchef style Dhaba Style Dal Tadka and fire viral on social media)

व्हिडिओ व्हायरल 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by flurting boy (@flurtingboy)

हा व्हिडीओ flurtingboy या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 1.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडिओवर कमेंट्सचा भरपूर पाऊस पडतोय. 

Read More