Marathi News> भारत
Advertisement

मस्ती करणाऱ्या व्यक्तीला घोड्याने शिकवला धडा, व्हिडीओ पाहून तुम्हाला ही आवरणार नाही हसू

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती घोड्याजवळ जातो आणि त्याच्या तोंडाला हात लावतो, परंतु त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुम्हाला खूपच वाईट वाटेल.

मस्ती करणाऱ्या व्यक्तीला घोड्याने शिकवला धडा, व्हिडीओ पाहून तुम्हाला ही आवरणार नाही हसू

मुंबई : सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. जे पाहताना आपला वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर आवरणार नाही. शिवाय तुम्हाला या व्यक्तीची कीव येईल. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती घोड्याजवळ जातो आणि त्याच्या तोंडाला हात लावतो, परंतु त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुम्हाला खूपच वाईट वाटेल.

या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, घोडा आणि तो व्यक्ती यांच्यात संभाषण सुरु असतं. त्यावेळी हा व्यक्ती प्रेमाने घोड्याच्या तोंडाला हात लावून उभा आहे. तेव्हा अचानक या घोड्याला काहीतरी होतं, ज्यामुळे तो उडी मारतो.

ज्यामुळे घोड्याची लाथ या व्यक्तीच्या पोटाला जोरात बसते. हा व्हिडीओ पाहून काही लोक असं देखील म्हणत आहेत की, या दोघांमध्ये असं काहीतरी संभाषण झालं, ज्यामुळे घोड्याला राग आला आणि त्याने या व्यक्तीला लाथ मारली.

कारण काहीही असो घोड्याची लाथ ही त्या व्यक्तीच्या पोटात बसली, ज्यामुळे या व्यक्तीच्या पोटात जोरदार कळ गेली, ज्यामुळे हा व्यक्ती उड्या मारत इकडे तिकडे फिरू लागला. हे सगळं आपल्याला पाहाताना मजेदार वाटत असलं तरी देखील या व्यक्तीला काय वेदना झाल्या असतील, हे त्याचं त्यालाच माहित.

हा व्हिडीओ 1000 WAYS TO DIE ने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही बातमी लिहिण्यापर्यंत व्हिडीओ 50 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, सुमारे 1 हजार लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे. काही लोकांनी घोड्याची स्तुती केली आहे. त्याचबरोबर काही लोकांनी प्राण्यांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला आहे.

Read More