Marathi News> भारत
Advertisement

नातवंडांच्या या सरप्राईजने आजारी आजोबा झाले खूश; Video होतोय व्हायरल

नातवडं आणि आजी-आजोबांचं नातं खूप खास असतं. या व्हिडीओमध्येही आजारी आजोबा आणि नातवंडांमधील प्रेम दिसून येतं आहे. 

 नातवंडांच्या या सरप्राईजने आजारी आजोबा झाले खूश; Video होतोय व्हायरल

Trending Video: सोशल मीडियाची दुनिया अजब आहेत. या सोशल मीडियाच्या जगाने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ आपल्या हृदयाला भिडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

नातवडं आणि आजी-आजोबांचं नातं खूप खास असतं. या व्हिडीओमध्येही आजारी आजोबा आणि नातवंडांमधील प्रेम दिसून येतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण नक्की म्हणाल क्या बात है! सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (trending video the sick grandfather was happy with this surprise of grandchildren viral dance video on social media) 

हा व्हायरल व्हिडीओ एका हॉस्पिटलमधील आहे. या हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध व्यक्ती उपचार घेताना दिसतं आहे. या आजारी आजोबांना खूष करण्यासाठी नातंवाडांनी चक्क हॉस्पिटलमधील रुममध्ये भांगडा केला. या दोघा तरुणांचा भांगडा बघून तिथे असलेली वृद्ध महिलादेखील स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकली नाही. 

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला  64 हजार व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे.हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येणार यात शंका नाही.

Read More