Marathi News> भारत
Advertisement

घरात ती एकटी असताना, तिचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद, Video सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video : लिंबू कलरच्या साडीमधील महिलेनंतर आता सोशल मीडियावर नारंगी रंगाच्या साडीच्या महिलेची चर्चा रंगली आहे. 

घरात ती एकटी असताना, तिचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद, Video सोशल मीडियावर व्हायरल

Women Viral Video : लिंबू कलरच्या साडीमधील महिलेची चर्चा सतत रंगत असते. अशोक सराफ यांचा अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील आजही तो रंग फिका पडला नाहीय. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या लिंबू रंगाच्या साडीतील महिला अधिकारीचा फोटो तुफान व्हायरल झाला. मग काय जो तो आजही इतकी वर्ष झाली लिंबू कलरची साडी आजही चर्चेत असते. पण हे काय अचानक नारंगी रंगाच्या साडीमधील महिलेची चर्चा होते आहे. 

Reel च्या नादात महिलेचे विचित्र कृत्य

घरात कोणी नसताना महिला काय करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांनी नक्कीच हा व्हिडीओ पाहा. सोशल मीडियाने महिलांनाही वेड लावलं आहे. तासंतास त्या सोशल मीडियावर खेळ घालवत असतात. एक महिला Reel च्या नादात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

काळ्या रंगाचं सिव्हलेस ब्लाऊज आणि नारंगी रंगाची साडी नेसून बिल्डिंगच्या गॅलरीत येते. त्यानंतर तिचं ते कृत्य समोरील इमारतीमधील व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करतं. सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होण्यासाठी ती मोबाईल जमिनीवर ठेवून अचानक नाचायला लागते. नाचताना त्या महिलेला जगाचा विसर पडतो. 

पण तिने सोशल मीडियावर नाचतानाचा व्हिडीओ टाकण्यापूर्वीच तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतो. तिच्या इमारतीसमोरील एका व्यक्तीने या महिलेचा व्हिडीओ काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. त्यातील काहीच व्हिडीओ हे ट्रेंड होतात. 

Read More